आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतील तपशील:‘गुडबाय’च्या कथेत जनरेशन गॅप, विचारांचा संघर्ष आणि कौटुंबिक भावनांवर आधारित

अमित कर्ण। मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी अमिताभ बच्चन यांचा ‘रनवे ३४’ आणि ‘झुंड’ सारखे चित्रपट रिलीज झाली आहेत. पुढे ‘ब्रह्मास्त्र’, ‘ऊंचाई’ आणि ‘गुडबाय’ आहेत. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये जेथे त्यांचे पात्र गुरु आणि शिष्याच्या कथेवर आधारित आहे दुसरीकडे ‘ऊंचाई’मध्ये चार मित्रांची निवृत्तीनंतरची कथा आहे. गुडबाय’ देखील त्यांच्या वाढदिवसांच्या चार दिवस आधी म्हणजे ७ ऑक्टोबरला येत आहे. त्याचे ट्रेलर रिलीज झाले आहे. या चित्रपटात ते एका अशा पात्राच्या भूमिकेत आहेत. ज्यांच्या आणि मुलीच्या विचारात खूप मोठा फरक असतो. जनरेशन गॅपमुळे त्यांचे विचार वेगळे असतात आणि कुरबूर होत असते. मात्र ते एकमेकांना खूप जीव लावतात. एकमेकांची काळजी घेतात.

समाज बदलत आहे, आपली जीवनशैलीही बदलत आहे : अमिताभ

अमिताभ यांनी आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाविषयी सांगितले,‘अनेक चित्रपट एकामागे एक प्रदर्शित होत असतात. आमच्या काळातही एकाच महिन्यात चार-चार चित्रपट रिलीज होत होती. वर्षातून आठ ते नऊ चित्रपट येत होती. ही काही नवी गोष्ट नाही. दुसरकडे कोरोनामुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. त्यामुळेच आता सर्व एकत्र येत आहेत. तसे तर कामाने कधीच समाधान होत नाही.

विकासने कौटुंबिक नात्यावर एक भाविनक चित्रपट बनवला...

अमिताभ म्हणतात...,‘गुडबाय’ असा चित्रपट आहे, तो कुटुंबाचे महत्व सांगतो. माझ्या मते, कुटुंबाची प्रमुख आई, बहिण, पत्नी असते. पुरुष तर फक्त काम करत असतो. आपण जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा िवचार करतो की, माझे आई-वडील असते, तर त्यांनी मला धीर दिला असता, मला मदत केली असती. पण माझ्या वडिलांचे निधन झाले होते तेव्हा मी निराश बसलो होतो. तेव्हा माझा एक मित्र म्हणाला, इतके दु:खी का दिसत आहात? मी उत्तर दिले, आताच वडिलांचे अंत्यसंस्कार करून आलाे आहे. तेव्हा मित्र म्हणाला, तुम्हाला नाराज नाही तर खुश व्हायला हवे, कारण तुम्ही ६० वर्षे सोबत राहिला. आम्ही तर फकत २५ वर्षांपर्यंतच सोबत राहिलो.

नव्या चित्रपटाविषयी जास्त विचार करत नाही : रश्मिका

रश्मिका म्हणते... ‘मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहे, तेथे लोक माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा करतात. त्यामुळे मला हिंदीतून मिळणाऱ्या अनेक प्रोजेक्ट्सविषयी मी जास्त विचार करत नाही. माझे मन जे म्हणते तेच मी करते आणि हा चित्रपट लोकांना आवडेल, असे माझे मन मला म्हणतेय.

बातम्या आणखी आहेत...