आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील शालेय विद्यार्थांना आता कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांची गोष्ट शिकवली जाणार आहे. याबाबत कर्नाटक सरकार विचार करत आहे. काही एनजीओ आणि लोकांनी एकत्रीत येऊन बंगळुरू महानगर पालिका शिक्षण विभागाला पत्राद्वारे मागणी केली आहे की, इयत्ता चौथी किंवा पाचवीच्या विद्यार्थांना अभ्यासक्रमात पुनीत यांचा एक धडा जोडण्यात यावा. मागणीला उत्तर देताना, या प्रस्तावावर सरकारसोबत चर्र्चा करणार असल्याचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी सांगितले. वास्तविक, मुलांमधील परोपकारीवृत्तीला किंवा मदत करण्याच्या भावनेला वृध्दींगत करण्यासाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
अनाथ आश्रम, वृद्धाश्रम चालवत होते पुनीत
2019 मध्ये उत्तर कर्नाटकात पुराचा उद्रेक झाला होता. त्यावेळी अभिनेता पुनीतही बी.एस. येडियुरप्पा यांच्या मदतीसाठी पुढे आले होतो. त्यानंतर त्यांनी 5 लाख रुपये कर्नाटकच्या मुख्यमंत्री मदत निधीला दिले. यासोबतच पुनीत २६ अनाथ आश्रम आणि १६ वृद्धाश्रम तसेच १९ गोशाळांच्या संचालनात सहकार्य करत होते. अनेक कन्नड भाषिक शाळा चालवण्यातही पुनीत यांचा मोठा हात होता.
आईसोबत आश्रम चालवायचे पुनीत
पुनीत आपल्या आईसोबत मैसुर मध्ये शक्तिधाम नावाने आश्रम चालवायचे. या आश्रमाच्या माध्यमातून ते हजारो मुलिंच्या शिक्षणाची सोय करायचे. ही एक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेमध्ये बलात्कार पीडितांना मदत करणे, मानवी तस्करी विरोधात मोहीम, वेश्याव्यवसायाच्या विरोधातही काम करण्यात आले आहे. एका अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे चार हजार महिलांनी येथून लाभ घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.