आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयान मुखर्जींचा प्रोजेक्ट:रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील दुसरे गाणे ‘देवा देवा'चा टिझर झाला प्रदर्शित

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे ‘केसरिया’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. आता ‘देवा देवा’ चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला रणबीर दुर्गेच्या मंडपामध्ये डोके टेकवताना दिसत आहे. यानंतर ते आलियाला ‘शक्ती’ चा अर्थ सांगू लागतात आणि मग ‘देवा देवा’ गाणे सुरू होते.

या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांची झलकही पाहायला मिळाली आहे. हे गाणे भगवान शिवावर आधारित आहे. हे गाणे 8 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण बल्गेरिया, लंडन, न्यूयॉर्क, एडिनबर्ग आणि वाराणसीसह इतर अनेक ठिकाणी झाले आहे.

हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाइट पिक्चर्स यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...