आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट:अक्षय कुमारच्या ‘कठपुतली'ची प्रतीक्षा संपली, 2 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारने आपल्या नव्या कठपुतली चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत घोषणा केली आहे. हा चित्रपट २ सप्टेंबरला डिझ्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला आहे. पूजा इंटरटेनमेंटची ही निर्मिती आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी रंजीत एम तिवारी यांनी पार पाडली आहे. अक्षयने त्याचा टीझर शेअर करते लिहिले, ‘ये खेल पावर का नहीं, दिमाग का है और इस माइंड गेम में आप और मैं सभी कठपुतली हैं...’

चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रसिद्ध होणार आहे. ३५ सेकंदाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. त्यात अक्षयसह रकुलप्रीत सिंह दिसणार आहे. सरगुन मेहताही झळकणार आहे. जॅकी भगनानी, वाशु भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी निर्मात्यांची जबाबदारी पार पाडली आहे. असीम अरोरांचे लेखन आहे. हा चित्रपट तामिळ ‘रत्सासन'चा रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...