आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजकोट झोन-1 चे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रवि मोहन सैनी यांची पोरबंदर येथे एसपी पदावर बदली झाली आहे. रवि मोहन सैनी यांनी 2001 मध्ये प्रसिद्ध क्विज शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी 1 कोटी रुपये जिंकले होते. त्यांनी ज्युनियर केबीसीमध्ये 15 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन मेगास्टार अमिताभ बच्चनचे मन जिंकले होते. आज ते 33 वर्षांचे आहेत पोरबंदरच्या एसपी पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला आहे. रवि मोहन सैनी 2014 मध्ये यूपीएससीची परीक्षा पास झाली आणि ते गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी झाले. रवि मोहन सैनी हे मूळचे राजस्थानमधील अलवरचे आहेत. त्यांचे वडीलही भारतीय नौदलातून निवृत्त झाले होते.
रवि मोहन सैनी यांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतले
रवि मोहन सैनी यांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर इंटर्नशिप केली. याच दरम्यान त्यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली. त्यांचे वडील नौदलात अधिकारी असल्याने त्यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील नेवल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. रवि दहावीत होते तेव्हा त्यांनी प्रथम कौन बनेगा करोडपती ज्युनियरमध्ये भाग घेतला. अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या कौन बनेगा करोडपती शोमध्ये रवी यांनी सर्व 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि 1 कोटी रूपये जिंकले. त्यानंतर रवीने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत एकसारखे क्षेत्र निवडले. शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.
एसपी म्हणून माझे पहिले प्राधान्य म्हणजे कोरोना
रवी यांनी सांगितले की, "मी एमबीबीएस केल्यानंतर इंटर्नशिप करत असताना यूपीएससीची परीक्षा पास झालो." माझे वडील नौदलात होते आणि त्यांनी मला पोलिस दलात भरती होण्यास प्रेरित केले. कोविड-19 च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पोरबंदरमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे प्राधान्य असेल, असे सैनी यांनी सांगितले.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.