आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टिन बीबरविषयी जाणून घ्या A to Z:कॅनडाच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहेत फॉलोअर, त्याचे चाहते स्वतःला म्हणवतात ‘बिलीबर्स’

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या जस्टिनच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी -

कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबर यावेळी संगीताऐवजी आजारपणामुळे चर्चेत आहे. रामसे हंट सिंड्रोममुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. हा पॉप गायक त्याच्या जस्टिस या व्हिडिओ अल्बमसाठी जगभरात दौरा करणार होता, तो आता पुढे ढकलला गेला आहे. त्याचा शो भारतातही प्रस्तावित आहे. हा पॉप स्टार जगभरातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

ट्विटरवर जस्टिनच्या फॉलोअर्सची संख्या 11 कोटींपेक्षा जास्त आहे, ती कॅनडाच्या एकूण 3.8 कोटी लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. पाच अल्बम पहिल्या क्रमांकावर असलेला तो अमेरिका प्रदेशातील सर्वात तरुण गायक आहे. त्याच्या गाण्यांच्या नावावर एकूण 33 विश्वविक्रम आहेत.

ट्विटरच्या एका अहवालात म्हटले आहे की, 2011 मध्ये त्याने त्याचे प्रसिद्ध केस कापले तेव्हा सुमारे 80 हजार संतप्त चाहत्यांनी त्याला ट्विटरवर फॉलो करणे बंद केले. यातील आश्चर्याची बाब म्हणजे एकेकाळी बेबी साँगने जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या बीबरचे हे गाणे आता अमेरिकेतील सर्वाधिक नापसंत गाणे झाले आहे. तो पेन्सिल ऑफ प्रॉमिस नावाची धर्मादाय संस्था चालवतो. ही संस्था विकसनशील देशांमध्ये शाळांच्या इमारती बांधते.

रामसे हंट सिंड्रोममुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे त्याचे सर्वात प्रसिद्ध 'बेबी' हे गाणे अमेरिकन्सना आता सर्वाधिक नापसंत

प्रारंभिक आयुष्य : आईने वाढवले, बालपण गरिबीत गेले
जस्टिन बीबर हा जेरेमी जॅक बीबर व पॅटी मॅलेट यांचे विवाहबाह्य मूल आहे. जेरेमी एमएमए फायटर होते. जस्टिन 11 महिन्यांचा असताना त्याचे पालक वेगळे झाले. आई पॅटीने त्याला एकटीने वाढवले. त्याच्या संगोपनात त्याची आजी आणि सावत्र आजोबांनी मदत केली. त्याच्या आईकडे उत्पन्नाचे चांगले साधन नसल्याने त्याचे बालपण अत्यंत अभावात गेले.

करिअर : यूट्यूबने केले मोठा गायक
वयाच्या 12 व्या वर्षी स्थानिक पातळीवर आयोजित स्ट्रॅटफोर्ड आयडियलमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले. यानंतर त्याची आई पॅटीने कुटुंब आणि मित्रांना पाहण्यासाठी यूट्यूबवर गायलेल्या गाण्याचे व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली, ते खूप प्रसिद्ध झाले. एकेदिवशी सो-सो डेफ रेकाॅर्डिंग्जचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह स्कूटर ब्रॉन नवीन आवाजाच्या शोधात गुगलवर गाणी शोधत होते. तेव्हा अचानक त्यांना 2007 मध्ये बीबरने गायलेले गाणे दिसले. ब्रॉन यांनी त्याच्याकडून अमेरिकन आर. अँड बी. गायक उशेर रेमंडसाठी गाणे गाऊन घ्यायला सुरुवात केली.

2009 मध्ये बीबरचा पहिला सिंगल “वन टाइम” रिलीज झाला. रिलीजच्या एका आठवड्यात गाणे कॅनेडियन हॉट 100 मध्ये 12 व्या क्रमांकावर पोहोचले. यानंतर आणखी सिंगल्स रिलीज झाले, 'वन लेस लोनली गर्ल', 'लव्ह मी' आणि 'फेव्हरेट गर्ल'. यूएस बिलबोर्ड हॉट 100 वर सर्वांनी टॉप 40 मध्ये स्थान मिळवले आहे, तेव्हा त्यांचा अल्बम अद्याप रिलीज झाला नव्हता. असे करणारा तो पहिला गायक ठरला. 2010 मध्ये जस्टिनच्या वर्ल्ड 2.0 या पहिल्या अल्बममधील बेबी हे गाणे रिलीज झाले. या गाण्याने त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. हे गाणे आंतरराष्ट्रीय बाजारात टॉप 3 मध्ये पोहोचले. 2010 मध्ये हा यूट्यूबवर जगातील सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडिओ झाला.

बातम्या आणखी आहेत...