आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे जहाज 47 कोटींचे, चित्रपट बनला 1250 कोटींत:टायटॅनिकच्या क्लायमॅक्ससाठी लागले 1 कोटी लिटर पाणी, चित्रपटाचा प्रत्येक मिनिट 8 कोटींचा

लेखक: ईफत कुरैशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

19 डिसेंबर 1997 रोजी प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 11 ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा चित्रपट त्यावेळचा जगातील सर्वात महागडा चित्रपट होता. 1912 मध्ये साऊथॅम्प्टनहून पहिल्या आणि शेवटच्या प्रवासावर निघालेल्या आरएमएस टायटॅनिकवर हा चित्रपट आधारित होता. एपिक रोमान्स आणि ट्रॅजेडीवरील या चित्रपटाचे बजेट टायटॅनिक जहाजाच्या बांधणीसाठी आलेल्या खर्चापेक्षाही 26 पट जास्त होते. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जेम्स कॅमेरून आहेत. जे अवतार, द टर्मिनेटर सारखे उत्कृष्ट चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात.

चित्रपट परफेक्ट बनवण्यासाठी मूळ टायटॅनिकची ब्लू प्रिंट पाहून टायटॅनिक जहाजाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तर चित्रपटात दिसणाऱ्या बहुतांश वस्तू, कार्पेट्सही त्याच कंपन्यांकडून तयार करवून घेण्यात आले होते, ज्यांनी मूळ जहाजासाठी काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंग आणि मेकिंगमध्ये प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची काळजी घेण्यात आली होती, तर अनेक वास्तविक घटनाही चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. जहाज बुडत असल्याचे दाखवण्याच्या केवळ एका सीनसाठी 1 कोटी लिटर पाणी वापरण्या आले होते. 3 तास 10 मिनिटांचा हा चित्रपट 200 कोटी डॉलर्स म्हणजेच 1250 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. त्‍याच्‍या प्रत्‍येक एक मिनिटाच्‍या सीनवर 8 कोटी रुपये खर्च झाले होते, त्‍यामुळे डायरेक्‍टर आणि डिस्ट्रिब्युटरमध्‍ये जोरदार खडाजंगी झाली होती.

आज, चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, जाणून घ्या या आयकॉनिक चित्रपटाच्या निर्मितीची रंजक कहाणी -

टायटॅनिकचे अस्सल फुटेज मिळविण्यासाठी 12 धोकादायक डायव्हिंग करण्यात आल्या होत्या

दिग्दर्शक आणि लेखक जेम्स कॅमेरून या चित्रपटाची कल्पना घेऊन 20th Century Fox Studios मध्ये गेले. सुरुवातीला जेम्स यांची दुर्घटनेसोबत प्रेमकथा जोडण्याची कल्पना त्यांना समजू शकली नाही. मात्र त्यांचे मन वळवण्यात जेम्स यशस्वी ठरले. अंटार्क्टिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे मूळ फुटेज गोळा करण्यासाठी जेम्स यांनी स्टुडिओकडे पैसे मागितले. जितके पैसे त्यांना बुडालेले खोटे टायटॅनिक जहाज दाखवण्यासाठी लागले असते, त्यात 30% रक्कम वाढवून खऱ्या टायटॅनिकचे फुटेज घेण्यासाठी बजेट तयार करण्यात आले.

1995 मध्ये, बुडालेल्या टायटॅनिकचे फुटेज घेण्यासाठी जेम्स कॅमेरून यांनी 12 वेळा 12,500 फूट खोल पाण्यात एका पाणबुडीच्या मदतीने गेले. पाण्याच्या जोरदार दाबात टीम खोलवर उतरली. एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण टीमचा जीव जाऊ शकत होता. या दाबामुळे एकीकडे टीमला धोका होता, तर दुसरीकडे फुटेज शूट करतानाही अनेक अडचणी येत होत्या.

एका डुबकीदरम्यान तर पाणबुडी टायटॅनिकच्या डेकवर आदळली आणि पाणबुडी आणि जहाज दोघांचेही नुकसान झाले. टायटॅनिकच्या महाकाय पायऱ्या आणि प्रवेशद्वाराचा एक छोटा तुकडाही तुटला.

या सर्व अडचणींतही, जेम्स कॅमेरून मूळ फुटेज आणण्यात यशस्वी ठरले. जे चित्रपटातही दाखवण्यात आले आहे.

पटकथा लिहिण्यासाठी, कॅमेरून यांनी जहाजाच्या दुर्घटनेतून वाचलेले लोक आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर 6 महिने संशोधन केले.

रोझचे खरे न्यूड स्केच दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी बनवले होते

31 जुलै 1994 रोजी चित्रपटाची प्रिन्सिपल फोटोग्राफी सुरू झाली. जहाजाच्या प्रस्थानाचे दृश्य 15 नोव्हेंबर रोजी शूट करण्यात आले होते. रोझचे मूळ नग्न पेंटिंग दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी बनवले होते. हा चित्रपटाचा पहिला सीन होता, कारण सेट इतका विस्तीर्ण होता की दुसरा सीन शूट करण्यासाठी काहीही मिळत नव्हते. वेळ वाचवण्यासाठी दिग्दर्शकाला हा सीन शूट करावा लागला.

क्रू मेंबरने रागाच्या भरात सर्वांना ड्रग दिले, 50 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले

जेम्स कॅमेरूनच्या कठोरपणामुळे संतप्त झालेल्या एका क्रू मेंबरने जेवणात ड्रग्ज मिसळले होते. त्यामुळे 50 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेम्स कॅमेरून यांना ड्रग्स शरीरात पसरण्यापूर्वी उलट्या झाल्या होत्या, त्यामुळे ते वाचले. जेम्स यांचे डोळे इतके लाल झाले होते की सगळे घाबरले होते. एवढा मोठा कट रचूनही अमली पदार्थ टाकणारा पकडला गेला नाही.

बर्फाळ पाण्यात शूटिंग करताना केट विन्सलेटला हायपोथर्मियाचा त्रास झाला

अनेक तास पाण्यात शूटिंग करत असताना अनेक जण सर्दी, फ्लू आणि किडनीच्या संसर्गाला बळी पडले होते. त्यांच्यात अभिनेत्री केट विन्सलेटचाही समावेश होता. थंड पाण्यात शूटिंग करताना केट विन्सलेटला हायपोथर्मिया झाला. त्याचवेळी क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान केटला न्यूमोनियाही झाला होता.

जॅकला वाचवण्यासाठी लोअर क्लासमध्ये जाणारी रोझ पाण्यात मधोमध अडकल्याचे दाखवण्यात आले होते. एका दृश्यात केट पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली होती. वास्तविक तिचे जॅकेट गेटमध्ये अडकले होते, त्यामुळे तिला बाहेर पडता येत नव्हते. जीव वाचवण्यासाठी तिला कोट काढून निघावे लागते.

शूटिंगदरम्यान, केट विन्सलेटला दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनची भीती वाटत होती, कारण ते परफेक्ट शॉटसाठी खूप ओरडायचे. जेम्सच्या कठोरपणामुळे नाराज होऊन केटने निर्णय घेतला की जोपर्यंत ती खूप श्रीमंत होत नाही तोपर्यंत ती त्याच्यासोबत काम करणार नाही. टायटॅनिक बुडण्याच्या शॉटचे चित्रीकरण करताना बुडण्याचीही भीती केटला होती.

शूटिंगमध्ये 3 स्टंटमनची हाडे मोडली. धोका पाहून अनेकांनी चित्रपट सोडून पळ काढला.

जॅक डॉसन नाही, जहाजात होते जे. डॉसन

लिओनार्डो डी कॅप्रिओने या चित्रपटात जॅक डॉसनची भूमिका साकारली होती, जे एक काल्पनिक पात्र होते. शुटिंग संपल्यानंतर हे उघड झाले की या अपघातात जे. डॉसन नावाच्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. दोघांचे आडनाव एक असणे हा निव्वळ योगायोग होता, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिस्टर जे. डॉसनच्या थडग्यावर लोकांची गर्दी व्हायला लागली की, तेच जॅक डॉसन आहेत.

चित्रपटातील अनेक पात्रे खरी होती

या चित्रपटात रोझ, जॅक सारखी काल्पनिक पात्रं असली तरी प्रत्यक्षात त्यात जहाजात असलेली अनेक अस्सल पात्रं होती. जसे नव्यानेच श्रीमंत झालेल्या मार्गारेट मॉली ब्राउन, ज्यांची भूमिका कॅथी बेट्स यांनी साकारली होती. यामध्ये शिप बिल्डर व्हिक्टर गार्बर, कॅप्टन बर्नार्ड हिल यांचा समावेश आहे.

जहाजाची मूळ ब्लूप्रिंट पाहून सेट तयार करण्यात आला होता

हा चित्रपट बनण्यापूर्वी टायटॅनिक जहाजाची मूळ ब्लू प्रिंट सेट बनवण्यासाठी वापरली होती. टायटॅनिक जहाजाचे निर्माते हॅराल्ड आणि वोल्फ यांनी निर्मात्यांसाठी त्यांचे खाजगी संग्रह उघडले होते, जेणेकरून त्यांना वास्तविक टायटॅनिक जहाज बनविण्यात मदत होईल.

टायटॅनिक चित्रपटात दाखविलेले फ्लोअर कार्पेटइंग्लंडच्या बीएमके-स्टोडार्ड यांनीच बनवले होते, ज्यांनी मूळ टायटॅनिक जहाजाचे कार्पेट बनवले होते.
टायटॅनिक चित्रपटात दाखविलेले फ्लोअर कार्पेटइंग्लंडच्या बीएमके-स्टोडार्ड यांनीच बनवले होते, ज्यांनी मूळ टायटॅनिक जहाजाचे कार्पेट बनवले होते.

चित्रपटात 1912 मधील उच्च वर्गीय समाजातील लोकांची योग्य वर्तणूक दाखवण्यासाठी सर्व कलाकारांसाठी सेटवर 24 तास एक शिष्टाचार प्रशिक्षक उपस्थित राहत होता.

रॉयल क्लासचे लोक परफेक्ट पद्धतीने दाखवण्यासाठी डायनिंग टेबलच्या सीनमध्ये खऱ्या बेलुगा कॅव्हियारची डिश ठेवण्यात आली होती, ज्याची किंमत त्यावेळी 4,500 डॉलर प्रति पौंड होती. ही जगातील सर्वात महागड्या डिशपैकी एक आहे. ही डिश महाकाय बेलुगा माशाच्या अंड्यापासून बनवली जाते.

प्रत्येक मिनिटाला 8.5 कोटी रुपये खर्च झाले

हा चित्रपट 200 कोटी डॉलर्समध्ये तयार करण्यात आला. प्रत्येक एका मिनिटाच्या सीनसाठी 1 कोटी डॉलर्स खर्च केले जात होते. बजेट वाढल्यावर वितरक आणि जेम्स कॅमेरून यांच्यात जोरदार वादावादी व्हायची. चित्रपट फक्त 2 तासांचा असावा अशी त्यांची इच्छा होती. जेणेकरून बजेट कमी राहील. 2 तासांचा चित्रपट असल्याने एका दिवसात जास्त शो दाखवून जास्त नफा कमावता आला असता, पण दिग्दर्शक ठाम होते. तुम्ही मला मारले तरच माझा चित्रपट लहान होईल, असे ते म्हणाले. याशिवाय कोणताही मार्ग नाही. वितरकांना जेम्ससमोर झुकावे लागले.

टायटॅनिकमध्ये दाखवल्या या चुका

  • टायटॅनिक 2:20 वाजता बुडाले, परंतु चित्रपटात, जेव्हा हॉल पाण्याने भरला होता, तेव्हा घड्याळात 2:15 वाजले होते.
  • द नाईट स्काय सीन, ज्यात ताऱ्यांची दिशा वास्तविक घटनेनुसार गोंधळलेली होती. 2012 मध्ये जेव्हा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा हा सीन दुरुस्त करण्यात आला होता.
  • चित्रपटाच्या 53 व्या मिनिटांच्या एका दृश्यात, जॅक रोझला सांगतो की, आपण सँटा मोनिका पिअरला जाऊन रोलर कोस्टर राईड करू. वास्तविक रोलर कोस्टर 1916 मध्ये बनले होते. तर जहाज 1912 मध्ये बुडाले होते.
  • टायटॅनिकची प्रतिकृती बंदरात उभी करण्यात आली तेव्हा त्याची दिशा चुकीची होती. हवामान अहवालानुसार वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे होती. त्यानुसार फनेलचा धूरही उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचा होता, पण निर्मात्यांनी उलट दिशेने शूटिंग केली होती.
  • ही एक चूक सुधारण्यासाठी निर्मात्यांना चित्रपटाची सर्व दृश्ये विरुद्ध दिशेने शूट करावी लागली. यानंतर फायनल एडिटिंगमध्ये सगळे सीन रिव्हर्स करण्यात आले होते.
  • 40 व्या मिनिटांच्या एका दृश्यात, जॅक रोझला सांगतो की त्याने व्हिस्कॉन्सिनमधील व्हिसोटा सरोवरात मासेमारी केली आहे, तथापि हा तलाव टायटॅनिक बुडाल्यानंतर 5 वर्षांनी तयार झाला होता.
  • वाचवल्यानंतर रोझ जेव्हा न्यूयॉर्कला पोहोचते तेव्हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दाखवला जातो. 1886 मध्ये बनवलेल्या या पुतळ्याचा रंग तपकिरी असला तरी 35 वर्षांनी बदलू लागला. 1912 पर्यंत पुतळ्याचा रंग तपकिरी होता, परंतु चित्रपटात तो तांबूस हिरवा दाखवला आहे.
  • रोझच्या संग्रहात पिकासोचे जे चित्र दाखवण्यात आले आहे, ते 1912 मध्ये आर्ट म्युझियम मोमाच्या प्रवेशद्वारावर लावलेले होते. ते आताही तिथेच आहे.

चित्रपटातही दाखवण्यात आलेल्या खऱ्या घटना...

मद्यधुंद शेफ बर्फाच्या पाण्यात उडी मारतो

जहाज बुडत असताना टायटॅनिकचा शेफ भरपूर वाईन पितो आणि नंतर पाण्यात उडी मारतो, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. खरंतर हे दृश्य खरे जहाज बुडाले तेव्हाचा आहे. जहाजाच्या शेफने खूप दारू पिऊन बर्फाळ पाण्यात उडी मारली होती. अनेक तास थंड पाण्यात राहूनही तो माणूस वाचला कारण अल्कोहोलमुळे त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते, ज्यामुळे तो थंड पाण्यात जगू शकला. जहाज बुडाल्यानंतर वाचवलेला तो शेवटचा माणूस होता.

सेफ्टी बोटीवर न जाता जहाज बुडण्याची वाट पाहणारे वृद्ध जोडपे

चित्रपटातील बुडण्याच्या दृश्यात एक वृद्ध जोडपे आपल्या खोलीतल्या बेडवर झोपून जहाज बुडण्याची वाट पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. वास्तविक ही घटना खऱ्या जहाजातून वाचलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली घटना होती. खरेतर, खालच्या वर्गात प्रवास करणाऱ्या एका माणसाला सेफ्टी बोटीवर बसण्यास सांगितले असता, त्याने बोटी कमी असल्याने सर्व महिला आणि मुलांना आधी बाहेर काढा, असे सांगून त्यात बसण्यास नकार दिला होता. पतीने नकार दिल्यावर पत्नीनेही जाण्यास नकार दिला आणि ती त्याच्यासोबत खोलीत थांबून वाट बघू लागली.

डेकवर खेळणारा मुलगा

टायटॅनिक जहाजाचा खरा फोटो पाहून हा सीन तयार करण्यात आला होता.

चित्रपटात दिसलेल्या व्हिंटेज कारचे मालक होते अमेरिकन विल्यम कार्टर

चित्रपटात दाखवलेली व्हिंटेज कार प्रत्यक्षात जहाजावर होती. ही कार अमेरिकन विल्यम कार्टरची होती, ज्यांनी ती युरोपमधून आपल्या कुटुंबासह सहलीला जाण्यासाठी खरेदी केली होती. त्या वेळी त्या कारची किंमत 5000 डॉलर होती, जी आज सुमारे 130,000 डॉलर असेल.

हा संवाद वाचलेल्यांच्या अनुभवातून लिहिला आहे.

रोझला आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी जॅकने बोललेला संवाद हा टायटॅनिक जहाज अपघातातून वाचलेल्या माणसाचा होता. तो संवाद असा होता की, मासेमारी करताना मी एकदा बर्फाळ पाण्यात पडलो, तेव्हा मला माझ्या शरीरात शेकडो सुया टोचल्यासारखे वाटले.

बातम्या आणखी आहेत...