आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम ड्रामा:अमित पाल आणि सीमा पाहवा यांच्या ‘जामताडा 2’ मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय क्राईम थ्रिलर मालिका ‘जामताडा: सबका नंबर आएगा’ चा दुसरा सीझन प्रसारित होणार आहे. त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या मालिकेत अमित पाल, स्पर्श श्रीवास्तव, सीमा पाहवा, मोनिका पनवार, आयुष्मान पुष्कर दिसणार आहेत. अमित आणि सीमा नेत्यांच्या भूमिकेत आहेत. ही मालिका फोन कॉलद्वारे केलेल्या फिशिंग स्कॅमवर आधारित आहे. शोच्या नवीन सीझनबद्दल बोलताना, दिग्दर्शक सौमेंद्र पाधी म्हणतात “गेल्या काही वर्षांत फिशिंग स्कॅमची संख्या प्रचंड वाढली आहे.

जामताडा येथील अनेक तरुणांनी अशा लोकांची फसवणूक केली आहे ज्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नाही. पहिला सीझन प्रचंड यशस्वी ठरला. त्यामुळे आम्ही त्याचा दुसरा सीझन घेऊन परतलो आहोत. या मालिकेद्वारे आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत आणि त्यांना जागरूकही करत आहोत.या मालिकेची कथा त्रिशांत श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. ती २३ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल.

बातम्या आणखी आहेत...