आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही, फिल्म अॅक्टर देबिना बॅनर्जीला जमावापासून वाचवताना तिचा पती गुरमीत चौधरी जखमी झाला आहे. मुळात गुरमीत आणि देबिना नवीन वर्षाच्या पार्टीतून परतत होते. त्यादरम्यान दोघेही चाहत्यांसोबत मध्येच अडकले. लोकांची गर्दी इतकी होती की त्यांना पुढे जाणे देखील अघवड झाले होते.
देबिनाला गर्दीतून काढत असताना कोणीतरी गुरमीतच्या हाताला आणि पायाला जोरदार धक्का दिला. गुरमीतच्या पायाला ओरखडे पडल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी देबिना देखील खूप अस्वस्थ झाल्याचे दिसून आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही चाहत्यांनी गुरमीत आणि देबिनाबद्दल चिंता व्यक्त केली. तर हा व्हिडिओला बऱ्याच नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. ट्रोलर्स म्हणतात की, एवढी दुखापत तर सामान्यच आहे. ती दाखवायची गरज काय आहे.
एका वर्षात दोन मुलांना जन्म
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी एका वर्षात दोनदा पालक झाले आहेत. देबिनाने 11 नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला. याआधी एप्रिलमध्ये दोघेही एका मुलाचे पालक झाले. वर्षभरात दोनदा पालक होणे हे स्वतःच धक्कादायक होते. मात्र, गुरमीत आणि देबिनाचे दुसरे बाळ प्री-मॅच्युअर होते.
लग्नानंतर 11 वर्षांनी पालक
'पति, पत्नी और वो' या रिअॅलिटी शोच्या शुटिंगदरम्यान गुरमीतने देबिनाला प्रपोज केले, त्यानंतर 2011 मध्ये दोघांनी एका खासगी समारंभात लग्न केले. 2008 मध्ये या दोघांची भेट 'रामायण' या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत त्यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. इथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. 15 फेब्रुवारी 2011 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.