आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:चा कायापालट:‘संजोग’ मालिकेसाठी टीव्ही कलाकार रजत दहियाने कमी केले 18 किलो वजन!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झी टीव्हीने हल्लीच रश्मी शर्मा टेलिफिल्म्ससह आपली नवीन मालिका ‘संजोग’ सुरू केली. या परिपक्व कौटुंबिक नाट्‌यामध्ये दोन अतिशय वेगळ्‌या माता असलेल्या अमृता आणि गौरी आणि त्यांच्या मुली यांच्यातील नात्याचा बारकावे दाखवण्यात येतील. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि कौतुक मिळत आहे. या मालिकेसाठी सर्वच कलाकार अतिशय मेहनत घेत असून रजत दहिया मात्र आपल्या व्यक्तिरेखेमध्ये शिरण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. झी टीव्हीवरील ‘तुझसे है राबता’मध्ये रजत लठ्ठ अशा ५५ वर्षीय माणसाची भूमिका करत होता. त्या मालिकेसाठी त्याने आपले वजन वाढवले होते. आता मात्र तिशीतील माणसाची भूमिका करण्यासाठी त्याला आपले वजन १५ ते १८ किलोने कमी करावे लागले. हे करून त्याने आपला अगदी कायापालट केला. रजत म्हणाला, गोपाळच्या भूमिकेसाठी मला खूप मेहनत घ्यायला लागली कारण याआधी ‘तुझसे है राबता’मध्ये मी ५५ वर्षीय अशा लठ्ठ माणसाची भूमिका करत होतो.

बातम्या आणखी आहेत...