आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदींच्या जाण्याने हृदयनाथ सावरले नाहीत:उषा मंगेशकर म्हणाल्या- दीदीच्या निधनानंतर आम्ही गाजराचा हलवा खाणे बंद केले

लेखक - उमेशकुमार उपाध्याय/ अरुणिमा शुल्का2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वरसम्राज्ञी गानकोकीळा लता मंगेशकर यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. लता दीदींना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतू त्यांच्या आठवणी अजूनही तशाच कायम आहेत. दीदींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांची बहीण उषा मंगेशकर यांच्याशी आम्ही संवाद साधला. उषा मंगेशकर या लतादीदींसमवेत राहत असत. भाऊ हृदयनाथ मंगेशकर देखील त्यांच्यासोबत राहत असत. उषा मंगेशकर म्हणाल्या की, कधी असे वाटतच नाही की, लता दीदी आमच्यासोबत नाहीत. त्या आजही आमच्यासोबत आहेत.

लतादीदींचे आपल्या भावावर विशेष प्रेम होते. तेवढेच प्रेम हृदयनाथजींचा देखील दीदींवर होते. उषाजी म्हणाल्या की, दीदींच्या निधनापासून गेल्या वर्षभरापासून भाऊ हृदयनाथ हे अजूनही सावरलेले नाहीत. त्यांना अजूनही त्यावर मात करता आली नाही. दीदी स्वयंपाक खूप छान करायची. विशेषत: गाजराचा हलवा तिला खास जमायचा. दीदी गेल्यानंतर आम्ही सर्वांनी गाजराचा हलवा खाणे बंद केले. आता आम्ही सर्वांनी हे निश्चित केले आहे की, गाजराचा हलवा आम्ही खाणार नाही.

वाचा लता दीदींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उषा मंगेशकर यांच्याशी दिव्य मराठीने साधलेला संवाद

प्रश्न- दीदी गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांशी स्थिती कशी आहे.

उत्तर- दीदींचे भाऊ हृदयनाथ यांच्यावर सर्वात जास्त प्रेम होते. भाऊंची प्रतिभा पाहून दीदींना तो खूप आवडायचा. भाऊंचा पाय खराब झाला होता, त्यामुळे दीदींना खूप त्रास व्हायचा. दीदी आजही आमच्यासोबतच आहे. दीदी गेल्यानंतर त्यांना भाऊ हृदयनाथ अजूनही त्या दु:खातून सावरले नाहीत. गेल्या एक वर्षापासून ते आजारी होते. आता आम्ही हळूहळू त्यांना त्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करित आहोत. आता पूर्वीपेक्षा खूप फरक झालेला आहे.

प्रश्न- दीदींविना सर्वांचे जीवन पुन्हा कसे रुळावर येतंय ?

उत्तर- उषा मंगेशकर म्हणाल्या की, दीदी आपल्यातून निघून गेली, यावर माझ्या अजूनही विश्वास नाही. मी सर्वकाही पूर्वीप्रमाणेच करते. जणू तिच्या खोलीत बसून तिच्याशी बोलते. मला वाटत नाही की, मी एकटी आहे. दीदी गेल्याचे अजूनही वाटत नाही. घरात सर्व काही पूर्वीसारखे आहे. घरची सगळी कामांकडे मीच लक्ष देते. कोण काय करतंय, कसं करतंय ते बघण्याची माझी जबाबदारी आहे. दीदी माझ्याशी बोलायची आणि मला सांगायची की हे बरोबर नाही. मी पण म्हणायचे की दीदी मला याची काळजी वाटते, मला मार्गदर्शन करं. मग आम्ही घराविषयी बोलायचो, आई बाबांबद्दल बोलायचो, हृदयनाथच्या मुलांसाठी काय आणायचं यावर बोलायचो. दीदी भावाच्या मुलांचे खूप लाड पुरवायची. मला या सगळ्या गोष्टी आठवतात. मी तिची कॉपी न करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या आठवणींमध्ये जगते. मला वाटते की, ही गोष्ट मी पूर्ण करावी, मग मी ती पूर्ण करते.

प्रश्न- दीदींना सर्वात जास्त काय आवडायचे?
उत्तर-
दीदींच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या त्यांना आवडायच्या. मी 80 वर्षे दीदींसोबत होते. दीदींबद्दल न ऐकलेली गोष्ट म्हणजे दीदींना स्वयंपाक करायला खूप आवडायचं. ती व्हेज आणि नॉनव्हेज सगळं बनवायची. ती काही वेगळ्या डीशेज देखील बनवत असे. जे कुटुंबातील सर्वांना खूर आवडायचे. दीदी गाजराचा हवला खूप छान बनवायची. परंतू जेव्हापासून आमच्यातून निघून गेली तेव्हा पासून आम्ही ठरवले की, गाजराचा हलवा अजिबात खायचा नाही. दीदी काही नॉनव्हेज पदार्थ खूप छान करायची. की आम्ही तिच्यामागे वेड्यासारखे लागायचो. विशेष म्हणजे दीदीने स्वतः बनवून क्रिकेटपटूंना देखील जेवण दिले होते.

एका क्रिकेटपटूने तर गाजराच्या हलव्याचे संपूर्ण भांडे उचलले आणि एकट्यानेच संपूर्ण हलवा खाल्ला. (खूप आग्रह करूनही उषाजींनी त्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले नाही.) दीदी जितकी चांगली गायीका होती, तितकीच छान स्वयंपाक देखील करायची.

प्रश्न- दीदींचे कोणते स्वप्न, जे संपूर्ण कुटुंब पूर्ण करत आहे ?

उत्तर- दीदींच्या स्मरणार्थ चवथ्या रुग्णालयाचे बांधकाम होत आहे. चौथ्या रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. बाकी 3 रुग्णालय देखील चांगली चालत आहेत. दीदींनी तेथील कर्मचारी आणि डॉक्टरांना सांगितले होते की, तुम्ही सर्वांची निस्वार्थ सेवा कराल, अशी मला खात्री आहे. उपचारासाठी कोणाकडूनही पैसे घेणार नाही. सर्व डॉक्टरांनी एकत्र राहावे. ज्यावेळी कोणाला तुमची गरज असेल, त्यावेळी तुम्ही हजर असाल. दीदींनी त्या लोकांना तिच्या प्रेमळ भाषेत समजावलं होतं की त्यांना कशा पद्धतीचे हॉस्पिटल हवंय.

दीदींची एक इच्छा होती जी तिने माझ्यासमोर सांगितली होती- कलाकारांचे म्हातारपण खूप वाईट होते. एकतर कुटुंबीय त्यांना भेटायला येत नाहीत किंवा त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे. या कारणास्तव मला असे वाटते की वृद्धाश्रम बनवावेत ज्यात आपण कलाकार ठेवू आणि त्यांची सेवा करावी.

वृद्धाश्रम बांधण्याचे त्यांचे स्वप्न आम्ही लवकरच पूर्ण करू. नाशिकला जमीन मिळाली. दीदींना वृद्धाश्रमात मंदिर, गोशाळा निर्माण करायची होती. दीदींची ही इच्छा आम्ही सर्वजण पूर्ण करित आहोत. दीदींनी स्वर माऊली फाऊंडेशन नावाची संस्थाही काढली होती.

दीदींचे सर्व सामान आम्ही सुरक्षित ठेवले आहे. मुंबई विद्यापीठासमोर दीदींच्या स्मरणार्थ आम्ही एक संस्था उभारत आहोत. त्यात आम्ही एक मुझ्यियम बनवत आहोत जिथे दीदींच्या सर्व वस्तू ठेवल्या जातील.

दीदी-उषा जी यांच्या स्मरणार्थ चौथे रुग्णालय बांधले जात आहे
दीदी-उषा जी यांच्या स्मरणार्थ चौथे रुग्णालय बांधले जात आहे

प्रश्न- दीदींच्या दिनचर्येची अशी कोणती गोष्ट आहे, जी रोज आठवण येते ?

उत्तर- मी सात वर्षांची होते, तेव्हापासून मी दीदींसोबत राहायचे. ती माझ्या मागे उभी आहे, असे मला वाटते. मी काहीही करेन, माझ्यावर कितीही संकटे आली तरी ती मला त्यातून बाहेर काढेल. कशाचीही भीती नाही. तिच्याशिवाय जगणे माझ्यासाठी अशक्य आहे. त्यांची एखादी गोष्ट कायम लक्षात राहते. दीदी म्हणायची, कामे नीट करा, चांगले रहा, गाणं कसं चाललं याविषयी आमच्यात छोट्यामोठ्या गोष्टीवर देखील चर्चा व्हायची. घरी बनवलेले अन्न कोणते, ते चांगले की वाईट. दीदींना पांढरा रंग खूप आवडायचा. मला दीदींच्या या सगळ्या गोष्टी आठवतात. दीदी काही वस्तू आणायची, जर मला आवडली नाही तर मी तिला सांगायचे की, ही वस्तू चांगली नाही. तरी देखील तिला कधी राग यायचा नाही. जर एखादी वस्तू आवडली तर माझ्यासाठी पुन्हा आण, अशी मी हक्काने तिला सांगायची.

प्रश्न- दीदींच्या निधनाची बातमी कळताच तेव्हा सर्वांची स्थिती कशी होती.

उत्तर- दीदींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो. त्यानंतर आम्ही कामानिमित्त घरी आलो होतो, मग रात्री 3 वाजता आम्हाला फोन आला की, तुम्ही लोक लवकर दवाखान्यात या. मग समजले की काहीतरी झाले आहे. त्याआधी आम्ही तिला पाहिले तेव्हा तिची प्रकृती चांगली नव्हती. डॉक्टरांनीही सांगितले की, ते आता यावर काहीही सांगू शकत नाही. मग दवाखान्यात पोहोचल्यावर आम्ही सगळे रूमच्या बाहेर बसलो होतो. त्यांना आमच्यासमोर आणले, मग कोणालाच काही भान राहिले नाही. कोविडमुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्यथा, ती आणखी एक वर्ष जगली असती. दीदी बेडवर होती, पण ती पूर्णपणे बरी होती. तिला कोरोना झाला आणि 2 दिवसात सर्व संपले. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये कसे नेले ते मी कधीही विसरणार नाही. तिला बघून मी डोळे मिटले होते, कारण तिला त्या अवस्थेत बघवत नव्हते. ती उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती, पण मी त्यावेळी तिच्याकडे पाहण्याचे धाडस केले नव्हते.

प्रश्न- दीदींशी संबंधित अशा काही गोष्टी आणि सवयींबद्दल सांगा, ज्या लोकांना माहित नाहीत?
उत्तर- दीदींची ही गोष्ट प्रेरणा देते की, कोणतेही काम करण्यापूर्वी घाबरू नये. ती म्हणायची की, जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर 2 दिवस थांबा, जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तेव्हाच रेकॉर्डिंग करा. दीदी खूप बेधडक होती. अजिबात घाबरत नव्हत्या. ती जेव्हा कधी स्टेजवर जायची तेव्हा लगेच गाणी म्हणायची. तिचा स्वत:वर एवढा विश्वास होता की, ती एकाच वेळी रेकॉर्डिंग करायची. आताही मी जेव्हा काही काम करते, तेव्हा मला तिने दिलेला आत्मविश्वास आठवतो. मला असे वाटते की, मी देखील दीदी जे काम करत असे, ते सर्व कामं करू शकते.

दीदींची देवावर खूप श्रद्धा होती. तिचा आईवडिलांवरही कमालीचा विश्वास होता. वडिलांच्या आणि आईच्या चरणांना स्पर्श केल्याशिवाय तिने कोणतेही काम केले नाही. ती वडिलांचे पाय धुवायची आणि सर्वांना तेच पाणी द्यायची. ती एक देवी आहे. लहानपणापासून ती हे सर्व करत असे. लता मंगेशकर ही देवाने निर्माण केलेली खास बाब होती. तिच्याच सरस्वतीचा अंश होता. तिच्याबद्दल कोणी कितीही वाईट बोलले तरी ती शांत राहायची. दीदी म्हणायची की, ठीक आहे ना, तो माणूस आहे. त्याच्याकडून चूका होतात. त्याला माफ केले पाहीजे.

प्रश्न- दीदींची शिस्तीची परंपरा तुम्ही कशी पाळता?
उत्तर-
देवाच्या मंदिरात रोज पूजा करावी, अशी दीदींची परंपरा आहे. दीवा लावला पाहीजे देवाच्या मंदिरात, पूजा झालीच पाहिजे. घरात स्वच्छता असावी. पाहुणे आले तर त्याचे स्वागत केले पाहिजे. ही त्याची परंपरा होती. ती जे करित असे तेच मी अनुकरण करते. मी प्रत्येकाची प्रमुख म्हणून भूमीका निभावते आणि प्रत्येकजण ते करते.

लता दीदी आणि उषा मंगेशकर 80 वर्षे एकत्र राहिल्या.
लता दीदी आणि उषा मंगेशकर 80 वर्षे एकत्र राहिल्या.

प्रश्न- लतादीदींच्या कोणत्या पाच गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक बहिणीकडे असणे आवश्यक आहे?
उत्तर- दीदींच्या या 5 गोष्टी ज्या मी फक्त बहिणींनाच नाही तर सगळ्यांना लागू होती, त्याबद्दल सांगते. पहिली साधेपणा, दुसरी तुमचा धर्म आणि देवावरची श्रद्धा. आई-वडिलांना कधीही विसरू नका. आई-वडिलांच्या आशीर्वादाशिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही, अशी दीदी म्हणायची.

जो कोणी शत्रू असेल त्याला क्षमा करा. सूड घेण्यासाठी बसू नका. बदला घ्यायचा असेल तर काही काम करा. दीदींना कुणीतरी सांगितलं होतं की, तिला ही भाषा येत नाही, म्हणून तिने ती शिकून स्वत:ला सिद्ध केलं. देवाच्या कृपेने ती सर्वांना क्षमा करायची. मी रागावले किंवा माझी चिडचिड झाली. तर ती मला लगेच शांत करायची. चिडचिड करून काहीही होणार नसल्याचे ती मला समजून सांगत असे. पाहुण्यांचे स्वागत करणे आणि कुटुंबांना जोडणे हे दीदींचे वैशिष्ट्य होते. दीदींचा परिवार खूप मोठा होता. लंडन, अमेरिकेपासून ते काश्मीरपर्यंत होते. म्हणूनच 21 देशांतील लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

दीदींना त्यांच्या नावाचा कधीच गर्व नव्हता. घरात कधीच थाट दाखवला नाही. आमचे घरही साधे आहे. घरात एक छोटा सोफा ठेवला आहे. दीदींना फक्त साधेपणा आवडायचा. दीदींना सुंदर गोष्टी आवडत होत्या. तिला अनेक वस्तू भेट म्हणून मिळाल्या होत्या, ज्या तिने मला जपून ठेवण्यास सांगितले. साधी अंगठी विकत घेतली तरी त्या अंगठीचा रिकामा डब्बा देखील काळजीपूर्वक ठेवायचा सल्ला देत असे.

आमच्या घरचे आराध्य दैवत असलेल्या मंगेशवर अर्थात शंकरावर तिची अढळ श्रद्धा होती. भगवान शंकरांशिवाय तिची साईबाबांवरही अतूट श्रद्धा होती. तसेच शारदा आणि दुर्गा यांच्यावर अतूट श्रद्धा होती. याशिवाय दीदींना संतांकडून खूप प्रेरणा मिळत असे. दीदीने भगवद्गीतेचाही अभ्यास केला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अन्य थोरपुरूषांबद्दल खूप आपुलकी होती. दीदी त्यांचे पूजा करायची.

या फोटोत लतादीदी बहीण मीना, आशा, उषा आणि भाऊ हृदयनाथ यांच्यासोबत दिसत आहेत.
या फोटोत लतादीदी बहीण मीना, आशा, उषा आणि भाऊ हृदयनाथ यांच्यासोबत दिसत आहेत.

प्रश्न- पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त काही कार्यक्रम प्लॅन आहे का ?
उत्तर- पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही काहीही करणार नाही. आम्ही कोणाला आमंत्रित करणार नाही. कोणताही कार्यक्रम घेणार नाहीत. हा पुण्यस्मरण आहे, आनंदाचा क्षण नाही.

बातम्या आणखी आहेत...