आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडी ड्रामा:अनीस बज्मीच्या आगामी चित्रपटात दिसू शकतो वरुण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवनचा हॉरर चित्रपट ‘भेडिया’ २५ नाेव्हेंबरला थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बातम्यांनुसार तो अनीस बज्मी यांच्या चित्रपटात दिसू शकतो. सूत्रांनी सांगितले, वरुण आणि अनीस पुढच्या वर्षासाठी एका प्रोजेक्टसाठी पहिल्यांदाच एकत्र काम करण्यावर चर्चा करणार आहेत. अनीस एका अॅक्शन कॉमेडी चित्रपटावर काम करत आहेत. वरुणacने या चित्रपटासाठी रस असल्याचे सांगितले आहे. शिवाय तो फायनल कथानक ऐकण्यासाठी वाट पाहत आहे. फायनल कथानक पूर्ण होताच चित्रपटाची टाीम पेपरवर्कचे काम पूर्ण करेल. झी स्टुडिओज आणि एशेलॉन प्रॉडक्शनचे विशाल राणा यांच्या संयुक्त विद्यमाने याची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होऊ शकते. अद्याप उर्वरित स्टारकास्टबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. इतर कामाविषयी बोलायचे झाले तर, वरुण त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या बायोपिक ‘इक्किस’ मध्ये दिसणार आहे, तो अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे.

बातम्या आणखी आहेत...