आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेमा यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकाराल्या होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रेमा किरण यांनी धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर,पागलपन,अर्जुन देवा,कुंकू झाले वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.
फक्त अभियनयच नाही तर प्रेमा किरण यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.