आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविराट कोहली आणि अनुष्का शर्मा शनिवारी सकाळी महाकाल मंदिरात पोहोचले. या ठिकाणी दोघांनी पहाटे 4 वाजता भस्म आरती करून महाकालचे दर्शन घेतले. पूजेनंतर विराटने माध्यमांशी बोलताना 'जय महाकाल' म्हटले. तर अनुष्का म्हणाली- भगवान महाकाल यांचे दर्शन करून खूप छान वाटले.
विराट-अनुष्का दीड तास नंदी हॉलमध्ये बसले होते. आरतीनंतर दोघांनीही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. विराटने गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. यासोबतच त्याने कपाळाला चंदनाचे त्रिपुण लावून धोतर घालून सोहळे परिधान केले होते. तर अनुष्काने साडी नेसली होती.
पाहा विराट-अनुष्का यांचे देवदर्शनाचे फोटो
नवीन वर्षांची सुरूवात वृदांवनातून केली होती
विराट आणि अनुष्का नवीन वर्षात वृंदावनला गेले होते. दोघेही वृंदावन येथील बाबा नीम करोली यांच्या आश्रमात पोहोचले होते. तेव्हा त्यांचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विराट-अनुष्कासोबत मुलगी वामिका देखील दिसली होती. ते वृदांवनात दोन दिवस थांबले होते. त्यानंतर ते आनंदमाई आश्रमात पोहोचले, जिथे त्यांनी संत-महंताची भेट घेतली होती.
हे ही वाचा
कोहली-अनुष्का पोहोचले वृंदावन आश्रमात:बाबा नीम करोलीचे घेतले आशीर्वाद ... ध्यानही केले
भारताचे स्टार जोडपे विरुष्का (विराट कोहली आणि अनुष्का शर्मा) बुधवारी भगवान कृष्णाच्या वृंदावन शहरात होते. तेथे दोघांनी बाबा नीम करोली यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ध्यानही केले. त्यांना प्रसाद म्हणून घोंगडी मिळाली. विराट-अनुष्काने बाल भोगचा प्रसादही खाल्ला. - येथे वाचा संपूर्ण बातमी
KL राहुल पत्नी अथियासह घेतले महाकालचे दर्शन : लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले; भस्म आरती केली
भारतीय क्रिकेटर केएल राहुल त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसह रविवारी सकाळी महाकाल मंदिरात पोहोचले. येथे दोघांनी भस्म आरतीत सहभागी होऊन महाकालचे आशीर्वाद घेतले. दोघेही गेल्या महिन्यातच विवाहबंधनात अडकले आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
क्रिकेटर अक्षरने पत्नीसोबत घेतले महाकालचे दर्शन: म्हणाला- लग्नानंतर बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल पत्नी मेहासह महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. सोमवारी पहाटे झालेल्या भस्म आरतीला दोघांनी हजेरी लावली. महाकालाचे आशीर्वाद घेतले. दोघांचेही गेल्या महिन्यातच जानेवारी महिन्यात लग्न झाले होते. अक्षर पटेल आणि मेहा यांनी नंदी हॉलमध्ये एका तासापेक्षा जास्त वेळ घालवला. भस्म आरतीनंतर दोघांनीही गर्भगृहात जाऊन पूजा व अभिषेक केला. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.