आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:एखादे स्पोर्ट्स बायोपिक करायची इच्छा आहे, नवीन भूमिकांचा प्रयोग करण्यापासूनही दूर राहणार नाही’- रकुल

किरण जैन। मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०२२ हे आतापर्यंत बॉलीवूड जगतासाठी फार विशेष राहिले नाही. पुन्हा एकदा हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हुकूमत गाजवतील अशी आशा चित्रपट जगताशी संबंधित लोकांना आहे. ‘अॅटॅक’ आणि ‘रनवे 34’ हे रकुल प्रीत सिंहचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. विशेष म्हणजे, यंदा रकुलचे एकूण सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सध्या बॉलीवूडचा वाईट काळ आहे, आता आशयात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे, असे तिला वाटते.

चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक चित्रपटगृहांत येतील
दैनिक दिव्‍य मराठीशी खास चर्चा करताना रकुल म्हणाली, की “हे पाहा, इतरांप्रमाणेच मलाही चित्रपट चांगले चालतील अशी अपेक्षा होती, यात शंका नाही पण सध्या बॉलीवूडचा वाईट काळ सुरू आहे. ही वेळ कठीण आहे, चित्रपटगृहात काय चालेल आणि काय नाही, हे आम्हाला माहीत नाही. दररोज अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, साहजिकच दररोज अपेक्षाही असतात. वेळ बदलली आहे, याचा आता स्वीकार करावा लागेल. प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधित असल्याने आम्हाला आता स्वत:मध्ये सुधारणा कराव्या लागतील. चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक चित्रपटगृहांत नक्की जातील.’

आता प्रेक्षकांच्या आवडीच्या दृष्टिकोनातूनच चित्रपट साइन करण्याचा माझा प्रयत्न राहील
रकुल म्हणते, ‘नेहमी अशी एक वेळ येते जेव्हा तुम्हाला प्रेक्षकांची नाडी आणि त्यांची आ‌वड कळते आणि मग तुम्ही त्याच अनुषंगाने चित्रपट बनवता. मग अशीही वेळ येते की प्रेक्षकांची आवड बदलते. हे कळायला दिग्दर्शकांना थोडा वेळ लागतो. आम्ही आता याच टप्प्यातून जात आहोत. अशा परिस्थितीत आम्ही केवळ अधिक कष्ट करण्याचाच विचार करू शकतो. एक कलाकार म्हणून मी आता प्रेक्षकांना जे आवडते, त्यानुसारच चित्रपट साइन करण्याचा प्रयत्न करणार आहे.’

‘कठपुतली’ चित्रपट आधीपासूनच ओटीटीसाठी तयार करण्यात आला
रकुलचा चित्रपट ‘कठपुतली’ डिजिटल प्लॅटफार्मवर आज प्रदर्शित होणार आहे. बॉक्स आॅफिसची सध्याची स्थिती पाहून तो चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला का?, या प्रशनावर रकुल म्हणाली, “नाही, हा चित्रपट सुरुवातीपासूनच ओटीटीसाठी बनवण्यात आला आहे. निर्मात्यांच्या या निर्णयावर मी संतुष्ट आहे. मला असेही वाटते की थ्रिलर अशी एक शैली आहे ज्याला ओटीटीवर अधिक पसंत केले जाते. लोकांना आमचा चित्रपट आवडावा, मग प्लॅटफार्म कोणताही असो, हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे.’

आतापर्यंतच्या आपल्या प्रवासावर संतुष्ट आहे...
चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत रकुल सांगते, “माझे पात्र दिव्या ही एक शिक्षिका आहे. ती फारच प्रगल्भ, हुशार आणि बुद्धिमान आहे. या पात्राची विशेषत: अशी की त्यामुळे मला खुणांची भाषा शिकायला मिळाली. मी स्वत:ला सुदैवी समजते की या चित्रपटामुळे मला नवनवीन कौशल्ये शिकायला मिळाली. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासावर खूप संतुष्ट आहे’

लव्ह स्टोरी टाइप चित्रपटही करण्याची इच्छा आहे
भविष्यात आपल्या प्रकल्पांच्या निवडीच्या पद्धतीबाबत रकुल सांगते, की ‘मी दक्षिणेत विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत. बॉलीवूडमध्येही असे प्रयोग करण्याबाबत मी कोणतेही पथ्य पाळणार नाही. मला वाटते, की आपल्या देशात अनेक थोर कथा आहेत ज्यांना बायोपिकच्या माध्यमातून दाखवले गेले पाहिजे. संधी मिळाली तर मला स्पोर्ट््स बायोपिक करायची इच्छा आहे. यासोबतच मला लव्ह स्टोरीज खूप आवडतात. अशा प्रकारच्या चित्रपटांत मी आतापर्यंत जास्त काम केलेले नाही. तथापि, आता तर सुरुवात आहे.’

बातम्या आणखी आहेत...