आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मदतीचा हात:‘कुर्बान हुआ’च्या सेटवर प्रतिभाला भेटला जवळचा मित्र, करण जोटवाणी प्रतिभासाठी आणतो घरचे जेवण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतिभा रांताचे कुटुंबीय शिमल्यात राहतात.

सक्तीची घरबंदी आता हळूहळू उठत असून बदलत्या परिस्थितीला जुळवून घेत लोकही कामासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. या स्थितीत झी टीव्हीच्या काही मालिकांचे चित्रीकरणही आता सुरू होत आहे. चित्रीकरण करताना सर्व कर्मचारी आणि कलाकारांच्या सुरक्षेसाठी सर्व नियम आणि खबरदारीचे उपाय अंमलात आणले जात असून निर्मात्यांनी सेट स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे सर्व उपाय अंमलात आणले आहेत. अर्थात दुस-यांची काळजी घेणारे केवळ तेच नाहीत. इतरही लोक यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. कलाकारांनीही आता आपल्या घरून जेवणाचे डबे आणण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री प्रतिभा रांतालाही घरचे जेवण उपलब्ध करून देणारा एक जोडीदार भेटला आहे. ‘झी टीव्ही’च्या ‘कुर्बान हुआ’ मालिकेत नील ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता करण जोटवाणी हा मालिकेत चाहतची भूमिका साकारणार्‍्या प्रतिभा रांताला आपल्या घरून बनविलेले जेवण घेऊन येत आहे. 

प्रतिभा रांताचे कुटुंबीय शिमल्यात राहतात. या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत असल्यामुळे प्रतिभा आता नुकतीच मुंबईत परतली आहे. पण येथे ती एकटीच असते. सध्याची परिस्थिती पाहता, बाहेरून अन्न मागविण्याचा धोका पत्करण्यास प्रतिभा तयार नव्हती. तेव्हा तिने आपला सहकलाकार असलेल्या करणकडे घरून जेवण मागविण्यासाठी विनंती केली. करणनेही ही विनंती तात्काळ मान्य केली. आता राजमा चावल असो की पास्ता, प्रतिभाला जे आवडेल ते पदार्थ करण आपल्याबरोबर घरून करून घेऊन येतो. 

या सहकलाकाराच्या रूपात आपल्याला एक सच्चा मित्र भेटल्याची भावना व्यक्त करून प्रतिभा रांता म्हणाली, “मुंबईसारख्या शहरात एकटीने राहणं, विशेषत: सध्याच्या आरोग्यास धोकादायक परिस्थितीत, ही सोपी गोष्ट नाही. स्वत:ची तब्येत निरोगी कशी राखायची, हाच सध्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. सध्या बाहेरून अन्न मागविणं किंवा स्वैपाक्याला घरी जेवण बनविण्यासाठी बोलावणं, हे सारखंच धोकादायक आहे. मी स्वत: घरी स्वयंपाक बनवू शकते, पण चित्रीकरणाच्या वेळा सांभाळून घरी स्वंयपाक करण्यासाठी मला वेळच मिळत नाही. पण सहकलाकार करण जोटवाणीच्या रूपात मला आता एक सच्चा मित्रही मिळाला आहे. तो त्याच्याबरोबरच माझंही घरून जेवण बनवून घेऊन येतो. त्याची आईच घरी जेवण बनविते आणि त्यांचा स्वयंपाक अतिशय रुचकर असतो. मला असं रोज घरचं जेवण सेटवर खायला मिळत असल्याचं पाहून माझ्या कुटुंबियांनाही समाधान वाटत आहे.”