आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री आत्महत्या प्रकरण:जवळच्या मित्राने प्रेक्षाच्या आत्महत्येवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाला - 'करिअरमुळे ती आत्महत्या करु शकत नाही, यामागे काही वेगळे कारण आहे' 

मुंबई (किरण जैन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काम न मिळाल्याने ती एवढे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही, असे प्रेक्षाच्या जवळच्या मित्राचे म्हणणे आहे.

'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' सारख्या शोमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने तिच्या इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वृत्तानुसार, प्रेक्षा लॉकडाऊनमुळे मुंबईहून तिच्या घरी परतली होती आणि गेल्या वर्षभरापासून काम न मिळाल्याने ती डिप्रेशनमध्ये होती. मात्र प्रेक्षाचा जवळचा मित्र आत्म प्रकाश मिश्राच्या म्हणण्यानुसार, काम न मिळाल्याने ती एवढे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही. यामागे काही वेगळे कारण असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

  • इतरांच्या आनंदात आनंद शोधायची प्रेक्षा

दिव्य मराठीसोबत झालेल्या बातचीतदरम्यान आत्म म्हणाला, "असे काय घडले ज्यामुळे प्रेक्षाने एवढे टोकाचे पाऊल उचलले, याविषयी खरंच मला काही ठाऊक नाही. गेल्या दोनवर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि ती अशी एक मुलगी होती, जी इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधायची. प्रेक्षा ही सकारात्मकतेचा भांडार होती, ती इतरांना प्रेरणा द्यायची. मग ती स्वतःचा जीव कसा घेऊ शकते, हे समजू शकत नाहीये? आमच्या सर्व मित्रांना धक्का बसला आहे. जर तिने तिचे आयुष्य एवढ्या कमी वयात संपवले, तर तुम्ही कल्पना करू शकता की तिने हे पाऊल किती कठोरपणे उचलले असावे. मी आठवड्याभरापूर्वी तिच्याशी बोललो होतो आणि यावेळी ती एकदाही काम  न मिळाल्याबद्दल बोलली नाही. नक्कीच इतरही काही गोष्टी असाव्यात ज्या ती कोणालाही सांगू शकली नाही."

  • आई-वडिलांची इच्छा होती की, तिने लग्न करावे

असे मानले जाते की, प्रेक्षाचे कुटुंबीय तिच्या लग्नासाठी आग्रह धरत होते.  याबद्दल आत्मने सांगितले, "प्रेक्षा तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इंदूरहून मुंबईला आली होती. अर्थात, प्रत्येक पालकांप्रमाणेच तिच्या आई-वडिलांचीसुद्धा तिने लग्न करावे, अशी इच्छा होती. त्यामुळे ती थोडी काळजीत पडली होती. पण या कारणामुळे ती आत्महत्या करेल, असे  नव्हते. तिला घरात राहणे आवडत नव्हते, ती बरीच स्वप्ने घेऊन मुंबईत आली होती. कदाचित ती घरी परतल्यानंतर काही घडले असावे, तिच्या डोक्यात काय सुरु होते, हे ठाऊक नाही. हो पण हे नक्की की तिला पैशांची चणचण नव्हती. मुंबईसारख्या शहरात ती चांगले आयुष्य जगत होती."

  • स्वत: ला मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचे स्वप्न होते

प्रेक्षाने 'सखा' नावाचा एक चित्रपट केला होता, पण मागील दोन वर्षांपासून तो रिलीज होऊ शकला नाही. आत्मने सांगितल्यानुसार, या गोष्टीमुळे ती थोडी निराश झाली होती. तो सांगतो, "चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यावर ती खूप खूष झाली होती. स्वत: ला मोठ्या पडद्यावर बघायला कोणत्या कलाकाराला आवडणार नाही? दोन वर्षे झाली तरी तिचा सखा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, ज्यामुळे ती थोडी निराश झाली होती.  स्वत: ला मोठ्या पडद्यावर पाहण्याचे तिचे स्वप्ने होते. मात्र आता हा आनंद तिला कधीच मिळणार नाही. परंतु याने ती कधीही डगमगली नव्हती. ती बरीच उत्तरे आपल्यासोबत घेऊन निघून गेली. "

बातम्या आणखी आहेत...