आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:'आदत से मजबूर' फेम अभिनेता मनमीत ग्रेवालची आत्महत्या, पत्नी मदतीसाठी ओरडत होती पण कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीतने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. 2017 ते 2018 या काळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'आदत से मजबूर' या कॉमेडी शोमध्ये मनमीत कृष्णा अभिषेकसोबत झळकला होता. 

कुणीही मदतीसाठी धावले नाही

मनमीतचा मित्र मनजीत सिंगने एका मुलाखतीत मनमीतने आत्महत्या केली त्या रात्री नेमके काय घडले होते, याचा खुलासा केला. मनजीतने सांगितल्यानुसार, “मनमीतने आत्महत्या केली, त्यादिवशी संध्याकाळपर्यंत सर्वकाही ठीक होतं. रात्री मनमीतची पत्नी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती. तेव्हा मनमीत त्याच्या खोलीत गेला. काही वेळाने त्याच्या खोलीतून खुर्ची पडल्याचा आवाज झाला. त्या आवाजाने पत्नीने खोलीकडे धाव घेतली. पत्नीच्या ओढळणीनेच मनमीतला गळफास घेतला होता. ते पाहून मनमीतची पत्नी त्याच्याकडे धावून गेली. त्याचे पाय धरले आणि त्याला खाली उतरवण्यासाठी जोरजोरात ओरडू  लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी आले. पण करोनाच्या भीतीमुळे मदतीसाठी कुणीही समोर आलं नाही. ओढणी फाडून त्याला खाली उतरवा, असं त्याची पत्नी ओरडत होती. मात्र सगळे जण तिची मदत करण्याऐवजी व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त होते. त्यावेळी मनमीतचा श्वास सुरू होता की नाही माहित नाही. पण कदाचित त्याक्षणी त्याला ताबडतोब मदत मिळाली असती तर आज कदाचित तो जिवंत असता.”

आर्थिक अडचणीचा करत होता सामना

अलीकडच्या काळातच त्याचे लग्न झाले होते. त्याचे कुटुंबीय पंजाबमध्ये राहात असून तो पत्नीसोबत मुंबईत वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसांपासून मनमीत आर्थिक अडचणीचा सामना करत होता. छोट्या भूमिकाही मिळत नसल्याने त्याचा तणाव वाढला होता. अलीकडेच त्याला एक वेब सीरिज मिळाली होती, मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण थांबले.त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की, घराचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. याच तणावाने अखेर त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. 

बातम्या आणखी आहेत...