आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉसमधील सर्वाधिक लोकप्रिय सदस्य अब्दू रोजिक अलीकडेच शोमधून बाहेर पडला. अचानक शोमधून त्याचे बाहेर पडणे त्याच्या चाहत्यांना रुचलेले नाही. अब्दूला शोमध्ये परत आणण्याची मागणी चाहते करत आहेत. आजारपणामुळे अब्दूला हा शो सोडावा लागतोय, अशी चर्चा होती. पण आता यामागील सत्य समोर आले आहे.
खरं तर, या शनिवारी बिग बॉसने शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना सांगितले की, अब्दू आजारपणामुळे नाही तर त्याच्या प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे घरातून बाहेर पडला आहे. अब्दूवर एक व्हिडिओ गेम बनवला जात आहे, ज्यासाठी लाइव्ह मोशन कॅप्चरिंग आवश्यक आहे. या कारणामुळे अब्दूला घराबाहेर जावे लागले. तसेच, अब्दूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे तो लवकरच बिग बॉसच्या घरात परत येऊ शकतो.
अब्दू पुन्हा शोमध्ये परत येऊ शकतो
अब्दु रोजिक यंदाच्या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. शोमधून अचानक बाहेर पडल्याने त्याचे चाहते निराश झाले होते. त्याच्या समर्थनार्थ त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रेंडही सुरू केला होता. पण आता तो लवकरच शोमध्ये कमबॅक करु शकतो, अशीची चर्चा सुरू झाली आहे.
अब्दुलचे जीवन संघर्षांनी भरलेले आहे
अब्जू रोजिकचा जन्म 3 सप्टेंबर 2003 रोजी तजाकिस्तानमध्ये झाला. अब्दू आता 19 वर्षांचा आहे पण त्याची उंची खूपच कमी आहे. त्याचे कारण आहे रिकेट्स आजार. हा असा आजार आहे, ज्यामुळे माणसाची उंची वाढत नाही. त्याची उंची कधीच वाढणार नाही हे अब्दूला लहानपणीच माहीत होते. पण आई-वडिलांनी हार न मानता अनेक डॉक्टरांना अब्दूला दाखवला. सर्वांनी नकार दिला. पण आशेचा किरण म्हणून एक डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी सांगितले की, अब्दूच्या आजारावर उपचार करता येतील पण खर्च खूप होईल. आर्थिक अडचणींमुळे अब्दूच्या पालकांना त्याच्यावर उपचार करता आले नाहीत. त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. कमी उंचीमुळे अनेकदा त्याची खिल्ली उडवली गेली. पण तो हताश झाला नाही. आज सोशल मीडियावर अब्दूचे 3.5 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखीन वाढ झाली आहे.
बिग बॉस 16चा शनिवारचा एपिसोड अतिशय इमोशनल असणार आहे. कारण या पर्वातील सर्वाधिक चर्चेत ठरलेला स्पर्धक अब्दू रोजिकला हे घर सोडून जावे लागणार आहे. अचानक या शोमधून त्याची एक्झिट होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही संभ्रमात पडले आहेत. वाचा सविस्तर...
1 ऑक्टोबरपासून बिग बॉस 16 सुरू झाला आहे. शोचा पहिला कन्फर्म स्पर्धक म्हणून अब्दू रोजिकचे नाव समोर आले होते. 19 वर्षीय अब्दूला एका आजाराने ग्रासले असून त्यामुळे त्याची उंची वाढली नाही. कमी उंचीमुळे त्याला बराच संघर्ष करावा लागला. कधी शाळेतून काढून टाकण्यात आले तर कधी कमी उंचीमुळे त्याची चेष्टा झाली. शाळेतील मुलांचे चेष्टेने मन भरले नाही तेव्हा वाटेत अडवून त्याला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. असे असूनही अब्दूने आशा सोडली नाही आणि देवावर आपली श्रद्धा ठेवली. आज त्याचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि बिग बॉसच्या घरात आपल्या बबली स्टाईलने तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोण आहे अब्दू रोजिक आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता-
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.