आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलावरुन वादंग:श्वेता तिवारीवर संतापला अभिनव कोहली,  म्हणाला - 'तुला लाज वाटत नाही का, पैसे पचवतेसही आणि म्हणते मी पैसे खर्च करत नाही'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या अभिनव आणखी काय म्हणाला?

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पुर्वाश्रमीचा पती अभिनव कोहली यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. दोघांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. श्वेता आपल्याला मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन खतरों के खिलाडी या शोसाठी केपटाऊनला निघून गेली, असा आरोप अभिनवने तिच्यावर केला होता.

अभिनवच्या आरोपांवर श्वेतानेदेखील तीव्र प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत श्वेता म्हणाली की, 'मी केपटाऊनला रेयांश, त्याची आया आणि आईला सोबत आणले असते पण अभिनवने यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा सहमती दिली नाही. मी रेयांशच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.” असे आरोप श्वेताने केले. श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत श्वेताने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

अभिनव म्हणाला- 'तुला लाज वाटत नाही'
मुलाच्या संगोपनावर पैसा खर्च न केल्याच्या आरोपावर अभिनव श्वेताला उद्देशून म्हणाला, 'तू मुलाखतीत म्हणालीस की मी माझ्या मुलाच्या संगोपनासाठी एक रुपया खर्च केला नाही. तुला जराही लाज वाटत नाही. जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो केला, त्यानंतर बालाजीसोबत दोन केले, जवळपास 40-40 टक्के पैसे मी माझ्या अकाऊंमधऊन तुझ्या अकाऊंटला ट्रान्सफर केले आहेत. पैसे पचवतेसही आणि म्हणते मी पैसे खर्च करत नाही. तू एकटीच पैसे खर्च करतेय,' असं म्हणत अभिनवने श्वेताने केलेले आरोप फेटाळले आहेत.

व्हिडिओमध्ये अभिनव आणखी काय म्हणाला?
अभिनव पुढे म्हणाला, 'जेव्हा तू मला मेसेज केला, तेव्हा मुलगा माझ्यासोबतच राहिल, असे मी तुला सांगितले होते. इथे महामारी सुरू आहे. लोक मरत आहेत आणि तू सगळं सोडून केपटाऊनला निघून गेली. तिसरी लाट तर लहान मुलांसाठी जास्त धोका दायक आहे. अशा वेळेत तू सर्व काही सोडून गेली कारण तुला फक्त पैसै कमवायचे आहेत. पैशाची एवढी कमतरता भासली की तू महामारीत मुलाला सोडून गेलीस. तुला जायचे होते, तर मुलाला माझ्याजवळ सोडून का गेली नाही?' असे आरोप अभिनव केले आहेत.

2013 मध्ये झाले होते श्वेता-अभिनवचे लग्न
श्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले होते. 2019 मध्ये दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहे. श्वेता आणि अभिनय ब-याच काळापासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टात भांडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...