आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनवची आपबीती:अभिनव कोहलीने पत्नी श्वेता तिवारीवर साधला निशाणा, म्हणाला - जेव्हा ती काही चुकीची करते, तेव्हा लगेच भावनिक खेळ खेळण्यास सुरुवात करते 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्वेताचा पोलिसांवर मोठा प्रभाव आहे, असे अभिनवने सांगितले.

'कसौटी जिंदगी की' मालिकेतील प्रेरणा म्हणजेच अभिनेत्री श्वेता तिवारीने गेल्या वर्षी पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. असं म्हटलं जात होतं की, ती आपल्या मुलांबरोबर स्वतंत्र राहत आहे. अलीकडेच अभिनवने श्वेताला तिच्या पोस्टद्वारे लक्ष्य केले आहे. अभिनवच्या मते, तो आपल्या मुलावर खूप प्रेम करतो आणि कधीही त्याच्यापासून विभक्त होऊ इच्छित नाही. अभिनवने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत आपले म्हणणे मांडले.

तसेच सोशल मीडियावर पोस्ट देखील केले

  • मी विक्टिम कार्डचा शिकार आहे

अभिनव म्हणाला- श्वेताने ज्या प्रकारे माध्यमात माझे नाव वापरले, तसा माणूस मी अजिबात नाही. मी खूप चांगल्या पार्श्वभूमीतून आलो आहे. माझे दिवंगत वडील एअरफोर्सचे अधिकारी होते आणि माझी आई डॉक्टर आहे. मी खूप चांगल्या वातावरणात वाढलो आहे. जेवेढे वाईट मला सांगितले गेले, तेवढा मी वाईट नाही. मी विक्टिम कार्डचा शिकार झालो आहे. माझ्या पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला शब्दांद्वारे कसे खेळायचे हे माहित नाही, कदाचित काही लोक मला समजू शकत नाहीत, परंतु मी फक्त लोकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मी भविष्यात देखील हे करतच राहीन. ती असे का करत आहे हे तिच्यापेक्षा कोणालाही चांगले माहिती नाही.

  • जेव्हा जेव्हा तिने काही चुकीचे केले तेव्हा तिने लगेच भावनात्मक खेळ खेळायला सुरुवात केली

तो पुढे म्हणतो- श्वेता मला आमचा मुलगा रेयांशला भेटू देत नाही. बरीच महिने मी शांत होतो कारण श्वेता माझ्या भावनांशी खेळत होती. जेव्हा जेव्हा तिने काही चूक केले आणि मी त्यावर तिला अडवलं असता तिने लगेचच भावनिक खेळ खेळायला सुरवात केली. त्यावेळी गोष्टी टाळण्यासाठी ती म्हणायची, रेयांश तुला मिस करतोय, तू घरी ये. आणि मी जे झाले ते झाले, आता ते ठीक होईल असे म्हणून तिला माफ करायचो. पण हा मुद्दा संपतच नाहीये.

  • जर मी तिच्या घरी गेलो तर ती ताबडतोब पोलिसांना बोलवते

श्वेताने गेल्या काही महिन्यांपासून अभिनवला आपल्या मुलाला भेटण्यास परवानगी दिली नाही. याबद्दल अभिनव म्हणतो- "मी श्वेताच्या घरापासून फक्त इमारत सोडून आपल्या आईसोबत राहतो. आता ती कोविड 19 चे कारण पुढे करुन माझ्या मुलाला भेटू देत नाही. माझा 6 जूनला वाढदिवस ता, तिने त्या दिवशीही नकार दिला. 21 जून रोजी फादर्स डे होता, त्यादिवशी तिने रेयांशला भेटायला नकार दिला होता. मी तिच्या घरी गेलो तर तिने ताबडतोब पोलिसांना फोन करते. ते माझेदेखील घर आहे हे पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मी घराच्या इंटीरियरमध्ये पैसे गुंतवले आहेत. मी 2012 पासून त्या घरात राहत आहे. श्वेताचा पोलिसांवर मोठा प्रभाव आहे. पोलिस मला धमकावतात. कायदा माझ्या बाजूने नाही, फक्त स्त्रियांचे म्हणणे ऐकतात. इतके असूनही, मी माझ्या मुलासाठी या सर्व समस्यांचा अंत करण्यासाठी तयार आहे.

  • मी स्वयंपूर्ण आहे आणि मी स्वतः लढा देईन

अभिनव सांगतो, श्वेताची  इच्छा आहे की मी सर्वकाही म्हणजे तिला रेयानला आणि घराला सोडून निघून जावे. पण मी हे होऊ देणार नाही. पहिल्या लग्नात तिने जे केले ते मी इथे होऊ देणार नाही. मी माझ्या अधिकारासाठी लढेन. मी चुकलो नाही. मी माझी प्रतिमा खराब होऊ देणार नाही. मी स्वयंपूर्ण आहे आणि स्वतः लढा देईल. मला सत्य सांगण्यात कोणतीही भीती नाही.

  • 3 जुलै 2013 रोजी झाले होते लग्न 

2010 पासून श्वेता अभिनेता अभिनव कोहलीला डेट करत होती. तथापि, त्याने हा खुलासा बराच काळानंतर केला. 2013 साली डान्स रियलिटी शो 'झलक दिखला जा'च्या स्टेजवर श्वेताने जाहीर केले होते की, ती जुलैमध्ये अभिनवसोबत लग्न करणार आहे. 3 जुलै 2013 ला झालेल्या या लग्नाला अत्यंत लो-प्रोफाइल ठेवण्यात आले होते, ज्यात टीव्ही इंडस्ट्रीतील श्वेताचे फक्त जवळचे मित्र सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...