आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Abhinav Kohli's Counterattack To Shweta Tiwari's CCTV Footage, Shared Video And Said Reyansh Did Not Want To Go To Her

अभिनवने केला श्वेतावर पलटवार:श्वेता तिवारीने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर अभिनव कोहलीचे उत्तर, व्हिडिओ शेअर करत सांगितले - रेयांशला तिच्याजवळ जायचे नव्हते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. दर दिवशी नवीन दावे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. ताजे उदाहरण म्हणजे श्वेताने तिच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करत अभिनवचे सत्य समोर आणत असल्याचे म्हटले होते. आता अभिनवने तिच्यावर पलटवार करताना सव्वा तासांचे लाइव्ह सेशन घेतले. यावेळी तो म्हणाला की, रेयांश (श्वेता-अभिनवचा मुलगा) त्याला घाबरत नसून उलट त्याला त्याच्या आईजवळच जायचे नव्हते.

अभिनवने श्वेतावर केला पलटवार
अभिनवने व्हिडिओमध्ये मुलगा रेयांश सोबतच्या आणखी काही व्हिडिओ क्लिप्स शेअर केल्या आहेत. अभिनव म्हणतो की, श्वेताला जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा रेयांश त्याच्यासोबत होता आणि जेव्हा पोलिस त्याला परत न्यायला आले, तेव्हा त्याने त्याच्या आईकडे जाण्यास नकार दिला. अभिनवने सांगितले की, हे व्हिडिओ फुटेज 16 ऑक्टोबर 2020 चे आहे. अभिनव म्हणाला, 'व्हिडिओमध्ये मी रेयांशला श्वेताकडून हिसकावून घेताना दिसतोय आणि त्यानंतर श्वेता खाली पडते. मात्र सत्य वेगळे आहे. प्रत्यक्षात श्वेता खाली पडत नाही तर बसते. आणि जर मी तिच्याकडून मुलाला हिसकावून घेऊन जातोय, तर ती इतक्या आरामात कशी चालत होती,' असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

श्वेताने शेअर केले होते सीसीटीव्ही फुटेज, म्हणाली होती - माझा मुलगा अभिनवला घाबरतो
श्वेताने साेशल मीडियावर आपल्या साेसायटीचा एक व्हिडिओ मंगळवारी शेअर केला होता. हा जुना व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तिचा पती अभिनव कोहलीने श्वेताला जमिनीवर पाडले आणि तिच्या हातातून मुलगा रेयांशला ओढताना दिसत आहे. श्वेता सध्या 'खतरों के खिलाडी सीझन 11’ साठी केपटाऊनला गेली आहे. मात्र तिने हा व्हिडिओ शेअर करत सांगितले, अभिनवच्या अशा वागण्यामुळे माझा मुलगा त्याला घाबरला आहे.

श्वेता म्हणाली होती - सत्य समोर यावे म्हणून टाकली पोस्ट
श्वेताने व्हिडिओमध्ये शेअर करत लिहिले होते, 'आता सत्य समोर आले पाहिजे. मात्र हा व्हिडिओ माझ्या अकाउंटवर नेहमीच राहणार नाही. मी नंतर तो काढून टाकेन. लोकांना सत्य कळावे म्हणून मी हा पोस्ट केला आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे माझं लेकरु त्याला घाबरते. या घटनेनंतर माझं लेकरू एक महिन्यापर्यंत घाबरत राहिलं. तो इतका घाबरला होता की रात्रभर झोपत नव्हता. त्याच्या हातालाही मार लागला होता. आता ताे आपल्या वडिलांच्या घरी जाण्यास आणि त्यांना भेटण्यास घाबरतो. मी माझ्या मुलाला आता मानसिक त्रास देऊ होणार नाही. मी त्याला शांत आणि खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. मात्र माझ्या मुलाचे मानसिक आरोग्य बिघडावे असे त्या माणसाला वाटते. हे शारीरिक शोषण नाही का ? हे माझ्या साेसायटीचे सीसीटीव्ही फुटेज आहे,' असे श्वेता म्हणाली होती.

बातम्या आणखी आहेत...