आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात:अभिनेते दर्शन जरीवाला म्हणाले -  'मी माझे तरुणपण पुन्हा जगतो आहे’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दर्शन जरीवाला म्हणाले - मला माझे पूर्वीचे शूटिंगचे दिवस आठवतात

छोट्या पडद्यावर 'सरगम की साढेसाती' ही नवीन सिटकॉम प्रेक्षकांच्या मनाला गुदगुल्या करून हसवते आहे, त्याचबरोबर त्यातील भावभावना प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श देखील करत आहेत. ही विनोदी मालिका सरगम नावाची तरुणी आणि साडेसात या संख्येशी असलेले तिचे खास नाते यांच्याभोवती फिरते. सरगमचे सासरे छेदिलाल (दर्शन जरीवाला) हे अवस्थी कुटुंबातील कवडीचुंबक आहेत आणि पैसे वाचवणे हेच त्यांच्या आयुष्यातील अंतिम ध्येय आहे. त्यांना अवस्थी कुटुंबावर वर्चस्व गाजावायला आवडते आणि प्रत्येक सदस्याने त्यांच्या नियमांनुसार जगावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

सरगम की साढेसातीच्या कलाकारांमध्ये वेगवेगळ्या पठडीचे गुणी, विचारवंत आणि गंमतीशीर कलाकार सहभागी आहेत, ज्यांच्यामुळे शूटिंगचे वातावरणच संपूर्णपणे बदलून गेले आहे. सेटवर तुम्हाला कधीच मरगळलेले वातावरण दिसणार नाही. इथे सतत हास्याच्या फैरी झडत असतात.

आपल्या सह-कलाकारांसोबत आपला काम करण्याचा अनुभव सांगताना दर्शन जरीवाला यांनी सांगितले, “मला या नवीन आणि तरुण कलाकारांसोबत काम करायला आवडते, कारण त्यांची भूक वेगळ्या प्रकारची आहे. ते खूप चुणचुणीत आहेत, मजेदार आहेत आणि एकंदरच त्यांची विचारप्रणाली वेगळ्या प्रकारची आहे.”

ते पुढे म्हणाले, “या मालिकेतले माझे सह-कलाकार इतके गंमतीशीर आणि उत्साहाने सळसळणारे आहेत की मला देखील वाटू लागते की मीही त्यांच्यातलाच एक आहे. त्यांना पाहून मला माझे पूर्वीचे शूटिंगचे दिवस आठवतात, जेव्हा आम्ही खूप हास्यविनोद, थट्टा-मस्करी करायचो, खोड्या काढायचो. त्यामुळे अशा तरुण कलाकारांबरोबर काम करणे खूप आल्हाददायक आहे.”

बातम्या आणखी आहेत...