आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारेगमप लिटिल चॅम्प्स:शोमध्ये पोहोचला अभिनेता गोविंद, बोलून दाखवली मनातील एक सुप्त इच्छा; ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचे होते आणखी काम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या या आठवड्याच्या भागात अभिनेता गोविंदा हजेरी लावणार आहे. यावेळी सर्व स्पर्धक गोविंदाची अनेक लोकप्रिय गाणी गाणार आहेत. यावेळी गोविंदाला या शोचा होस्ट मनीष पॉलने त्याच्या काही नायिकांबद्दल प्रश्न विचारले. रवीना टंडन, जूही चावला, करिष्मा कपूर किंवा माधुरी दीक्षित यापैकी त्यांची आवडती नायिका कोणती, असे विचारल्यावर गोविंदाने आपल्या मनातील एक इच्छा व्यक्त केली आहे.

गोविंदा म्हणाला, “माधुरीजी सोडल्यास यापैकी प्रत्येक अभिनेत्रींबरोबर मी अर्धा डझन तरी चित्रपट केले आहेत. खरं तर रवीनाबरोबर मी इतक्या चित्रपटांत एकत्र भूमिका साकारेन असं मलाही वाटलं नव्हतं. पण तसं झालं. तेव्हा आम्ही एकमेकांना खूप सांभाळून घेतलं. माधुरीजींबरोबरही मला इतक्या प्रमाणावर चित्रपटांतून भूमिका साकारता आल्या असत्या, तर बरं झालं असतं, असं मला वाटतं!”

आपल्या फिल्मी करिअरमध्ये यापैकी प्रत्येक नायिकेचाही तितकाच मोठा वाटा आहे आणि त्या आपल्यामागे खंबीरपणे कशा उभ्या राहिल्या, ते सांगताना गोविंदा म्हणाले, “मी स्वत:ला खरंच खूप सुदैवी समजतो कारण माझ्या चित्रपटांतील गाण्यांशिवाय या प्रत्येक नायिकेबरोबर माझं जे छान सूर जुळले, ते सर्वच प्रेक्षकांनाही पसंत पडल्याचं दिसतं. निर्माता आणि दिग्दर्शकांच्या एका पिढीबरोबर मी काम करीत होतो. त्यामुळे ते निर्माते-दिग्दर्शकही माझ्याप्रमाणेच वयाने वाढत होते. माझ्या कारकीर्दीच्या यशात त्यांच्याप्रमाणेच माझ्या नायिकांचाही वाटा आहे. मी एकाच वेळी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण करीत असल्याने मला सेटवर यायला नेहमीच उशिर होत असे. तरीही या नायिकांनी मला सांभाळून घेतलं. या नायिका माझ्यासाठी भाग्यवान ठरल्या आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”, असेही तो यावेळी म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...