आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Actor Govinda Reunites With Neelam Kothari After 20 Years On Super Dancer 4, Dance On The Iconic Song Aapke Ajaane Se

सुपर डान्सर चॅप्टर 4:20 वर्षांनंतर एकत्र आले गोविंदा आणि नीलम कोठारी, 'आपके आ जाने से' गाण्यावर केला धम्माल डान्स; व्हिडिओ व्हायरल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आठवड्यात प्रसारित होणाऱ्या सुपर डान्सर चॅप्टर 4 या शोमध्ये हे दोघे पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'सुपर डान्सर चॅप्टर 4' च्या आगामी एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या स्पेशल एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रोमोमध्ये या दोघांनीही त्यांच्यावर चित्रीत झालेल्या आणि गाजलेल्या 'आप के आ जाने से' गाण्यावर जबरदस्त डान्स सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यांचा परफॉर्मन्स बघून शोचे जज शिल्पा शेट्टी, अनुराग बसू, गीता कपूर त्यांना भरभरून दाद देताना दिसत आहेत.

20 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली
नीलमचे पती आणि अभिनेते समीर सोनी यांनीही या स्पेशल एपिसोडची प्रोमो क्लिप आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासह कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "गोविंदा आणि नीलम कोठारी... आणि 20 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे."

80-90 च्या दशकात सुपरहिट ठरली होती गोविंदा-नीलमची जोडी
गोविंदा आणि नीलमची जोडी 80-90 च्या दशकातील सुपरहिट जोड्यांपैकी एक होती. 'इलजाम' हा दोघांचा एकत्र असलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांनी पसंत केली होती. यानंतर गोविंदा आणि नीलम यांनी 14 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'घराना', 'खुदगर्ज', 'सिंदूर', 'हत्या', 'लव्ह' 86', 'दो कैदी', 'इलजाम', 'फर्ज की जंग', 'बिल्लू बादशाह', 'ताकतवर', 'घर में राम गली में श्याम', 'दोस्त गरीबों का'सारखे अनेक उत्तम चित्रपट केले.

नीलम कोठारीने 2001 मध्ये अभिनय करिअरला रामराम ठोकला होता. पण 2020 मध्ये तिने नेटफ्लिक्सची रिअ‍ॅलिटी बेस्ड सीरिज 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ह्स'द्वारे पुनरागमन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...