आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू एंट्री:'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये होणार बाल ब्रह्मचारीची एंट्री,  गुडियाच्या आयुष्यात निर्माण करणार गोंधळ

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे नवीन पात्र गुडिया व तिच्‍या कुटुंबाच्‍या जीवनामध्‍ये गोंधळ निर्माण करणार आहे

अँण्‍ड टीव्‍हीवरील 'गुडिया हमारी सभी पे भारी' या मालिकेत एका धडाकेबाज अभिनेता रोमांचक वळणावर प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे. आपल्या लाडक्या गुडियाची भूमिका साकारणा-या सारिका बेहरोलियाला सेटवर परतल्‍याने खूप आनंद झाला आहे आणि ती  प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यास उत्सुक आहे. कोणीतरी गुडियाच्‍या जीवनामध्‍ये प्रवेश करणार आहे आणि तिच्या व तिच्‍या संपूर्ण कुटुंबाच्‍या जीवनामध्‍ये गोंधळ निर्माण करणार आहे. ही व्‍यक्‍ती आहे चित्रपट 'मेरे डॅड की मारूती'मधून प्रसिद्धी मिळालेला देखणा अभिनेता करम राजपाल.

विविध टेलिव्हिजन मालिकांमध्‍ये काम केल्‍यानंतर करम राजपाल आता मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये दिसणार आहे. या नवीन प्रोजेक्टबद्दल करम म्‍हणाला, ''मला हे सांगताना खूप आनंद होत आहे. मला रवी महाशब्‍दे व समता मॅडम सारख्‍या कलाकारांसोबत काम करण्‍याची ही संधी दिल्‍याबद्दल मी निर्मात्‍यांचा ऋणी आहे. सारिका ही देखील प्रेमळ व उत्‍साहपूर्ण आहे.  मी बाल ब्रह्मचारीची भूमिका साकारत आहे आणि गुडियाच्‍या भावी जीवनात येणा-या गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुक आहे.''  

बातम्या आणखी आहेत...