आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करणवीरच्या घरी चिमुकलीचे आगमन:जुळ्या मुलींनंतर करणवीर बोहराच्या पत्नीने दिला मुलीला जन्म, फोटो शेअर करुन करणवीर म्हणाला - आमच्या घरी आता लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणवीरच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी टीजे सिद्धू दुसर्‍यांदा पालक बनले आहेत. त्यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. 2016 मध्ये हे जोडपे जुळ्या मुलींचे आईबाबा झाले होते. बेला आणि विएना ही त्यांच्या जुळ्या मुलींची नावे आहेत. तिस-या मुलीच्या जन्माची बातमी करणवीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. टीजे सिद्धू कॅनेडामध्ये आपल्या आईच्या घरी आहे. करणवीर काही दिवसांपूर्वीच कॅनडा येथे पोहोचला होता.

आमच्या घरी आता लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तीन देवी आहेत
तिन्ही मुलींसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत करणवीरने आनंद व्यक्त केला आहे. ‘मला किती आनंद होतोय हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी आता तीन मुलींचा पिता आहे आणि यापेक्षा सुंदर आयुष्य असूच शकत नाही. माझ्या आयुष्यातील या सर्व परींसाठी देवा तुझे खूप खूप आभात’, असे म्हणत करणवीरने तिघींचा उल्लेख लक्ष्म, सरस्वती आणि पार्वती असा केला.

करणवीरच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून व कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता जय भानुशालीसह गौहर खान, अश्मित पटेल, माही वीज, युविका चौधरी, श्रुती सेठ, गीता फोगाट यांनी करणवीर आणि टीजेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser