आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

न्यू एन्ट्री:‘कुमकुम भाग्य’मध्ये अभिनेता मनिष खन्नाची एन्ट्री, पुन्हा एकदा दिसणार खलनायकाच्या रुपात 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता मनीष खन्ना रोमांचक नवीन वळणासह मालिकेत सामिल होणार

आता लॉकडाऊन हळूहळू उठत चालला असून देशभरातील लोक नवीन सामान्य आयुष्यात प्रवेश करत आहेत. लवकरच मालिकांचे फ्रेश एपिसोड्सदेखील प्रेक्षकांना बघता येणार आहेत. झी टीव्ही वाहिनीवरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेच्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली असून नवीन ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना बघता येणार आहेत.

त्यातच नवीन व्यक्तिरेखा दुष्यंत सिंग चौबेच्या रूपात लोकप्रिय टीव्ही अभिनेता मनिष खन्नाची एन्ट्री या मालिकेत होणार आहे. ‘कुमकुम भाग्य’मध्ये दुष्यंतच्या व्यक्तिरेखेमुळे रणबीर आणि प्राचीच्या आयुष्यात वादळ निर्माण होईल. मायाच्या अंकलची भूमिका करत असलेले दुष्यंत रणबीर आणि मायाच्या आयुष्यात समस्या निर्माण करतील. खलनायकी भूमिका साकारणारा मनिष या  कथानकामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत आणि ते याबद्दल अतिशय उत्साहात आहेत. 

‘कुमकुम भाग्य’मध्ये सामिल होण्याबद्दल मनिष खन्ना म्हणाले, “‘कुमकुम भाग्य’ हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शोज्‌पैकी एक आहे आणि या शो चा हिस्सा बनणे हा माझा सन्मानच आहे. 'इश्क सुभान अल्लाह'नंतर झी टीव्हीवरील शोमधील माझी ही सलग दुसरी खलनायकी भूमिका आहे. रणबीर आणि प्राचीच्या आयुष्यात मी जी काही नाट्‌यमय वळणे आणेन ती प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. आम्ही चित्रीकरणाला सुरूवात केली असून सेटवर परत येताना मला खूप छान वाटतंय. 13 जुलैपासून सुरू होत असलेल्या शोमध्ये नवीन वळणे आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”  

रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चाफेकर) यांच्या आयुष्यात पुढे काय होईल ते पाहण्यासाठी प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत. लॉकडाऊनच्या आधीच्या भागांमध्ये पाहायला मिळाले की, रणबीरने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर प्राची त्याच्यापासून लांब राहू लागली आहे, पण खरंतर मनातून तिचेही त्याच्यावर प्रेम आहे. त्याचे लग्न मायाशी ठरले आहे. पण मॉलमध्ये रणबीर आणि प्राची यांची केमिस्ट्री त्याची आजी दलजीत आणि आई पल्लवी पाहतात, काय त्या मायासोबतची त्याची एंगेजमेंट वेळेत थांबवतील? नवीन एपिसोड्‌स 13 जुलैपासून पाहायला मिळतील.

0