आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पुण्यश्लोक अहिल्याबाई':अभिनेता राजेश शृंगारपुरे साकारणार 'ही' खास भूमिका, म्हणाला - इतके पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तिमत्व साकारण्याची माझी ही पहिलीच वेळ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच घेऊन येत आहे एक ऐतिहासिक मालिका – पुण्यश्लोक अहिल्याबाई. ‘अहिल्याबाई होळकर’ यांच्या अद्वितीय जीवनावर आधारित ही मालिका 18व्या शतकातील इतिहास सांगते. अहिल्याबाईंनी आपले सासरे, मल्हारराव होळकर यांच्या पाठिंब्याने समाजात प्रचलित पितृसत्ताक रुढींचा हिरीरीने विरोध केला आणि लोकांच्या व विशेषतः महिलांच्या कल्याणासाठी समारात्मक योगदान दिले. अहिल्याबाईंच्या सार्थक जीवनाची ही शौर्यगाथा आहे, जी तिच्या सासर्‍यांच्या म्हणजे मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य होऊ शकली नसती.

मल्हारराव एक पराक्रमी सरदार होते, हे सर्वश्रुत आहे. राज्य चालवण्याची त्यांची पद्धत वेगळीच होती. हे विराट व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी प्रसिद्ध टीव्ही कलाकार राजेश शृंगारपुरेची निवड करण्यात आली आहे. या अभिनेत्याने मराठी तसेच बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या माध्यमात खूप वेगवेगळ्या प्रकारचे काम केलेले आहे.

या मालिकेचा एक भाग होत असल्याचा आनंद व्यक्त करताना राजेश शृंगारपुरे म्हणाला, “ही मालिका अनेक प्रकारे माझ्यासाठी विशेष आहे. मी माझ्या कारकिर्दीत काही पौराणिक भूमिका केलेल्या आहेत, पण इतके पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तिमत्व साकारण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. मला जेव्हा मल्हारराव या भूमिकेसाठी विचारण्यात आले, तेव्हा त्या भूमिकेने मला लगेच आकृष्ट केले. हे एक दूरदर्शी व्यक्तित्व आहे. मल्हारराव समाजातील सर्व पितृप्रधान रुढींच्या विरुद्ध लढले आणि आपली सून अहिल्याबाई हिच्या पाठीशी उभे राहून एक उदाहरण घालून दिले. भारतीय इतिहासातील एक अजरामर शासक मल्हारराव यांचा वारसा कथारूपाने सादर करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य मानतो.”

राणी अहिल्याबाई आणि तिचे सासरे महान शासक मल्हारराव यांच्यातील उमदे नाते जाणून घेण्यासाठी बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई ही नवी मालिका. येत्या 4 जानेवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेन्ट टेलिव्हिजनवर ही मालिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser