आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहिती आहे:अभिनेता राजकुमार रावने 'बुगी वुगी' या डान्स शोसाठी दिले होते ऑडिशन, मात्र झाला होता रिजेक्ट; एवढ्या वर्षांनी स्वतः केला खुलासा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज हा एक उत्कृष्ट डान्सर असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे.

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि नुसरत भरूचा आपल्या आगामी 'छलांग' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहोचले होते. या शोमध्ये राजकुमार रावने एक मोठा खुलासा केला. एकेकाळी छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या 'बुगी वुगी' या डान्स शोसाठी ऑडिशन दिल्याचे त्याने यावेळी सांगितले. मात्र ऑडिशनमध्ये राजकुमार रिजेक्ट झाला होता. 1996 मध्ये सुरु झालेल्या या शोची प्रचंड क्रेझ होती.

राजकुमारने सांगितले, “मी अकरावीत असताना माझ्या छोट्या भावाला घेऊन मुंबईत बुगी वुगीसाठी ऑडिशन देण्यासाठी आलो होतो. पण तेव्हा माझी निवड होऊ शकली नव्हती. आता इतक्या वर्षांनी डान्सच्या मंचावर येऊन मला खूप आनंद होतोय”, असे तो म्हणाला.

राजकुमार राव हा उत्तम डान्सर आहे

मलायका अरोरा म्हणाली, "राज हा एक उत्कृष्ट डान्सर असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. एका चित्रपटात त्याच्यासोबत डान्स करण्याची संधी मला मिळाली होती. डॉली की डोली या चित्रपटात आम्ही एकत्र एका गाणे केले होते. जेव्हा आम्ही सेटवर आलो, तेव्हा राज अतिशय शांत होतो. पण जसे गाणे सुरु झाले, तो मस्तीत डान्स करु लागला.''

या शोमध्ये मलायका अरोरा यांनी राजकुमार राव यांनी 'नजर ना लग जाए' या गाण्यावर एकत्र ताल धरला.

बातम्या आणखी आहेत...