आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग अपडेट:‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’मध्‍ये अभिनेता शोएब कबीरची एंट्री

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’चे नवीन एपिसोड्स 13 जुलै पासून रात्री साडे आठ वाजता प्रसारित होणार आहेत.

अॅण्ड टीव्‍हीवरील मालिका ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’च्या चित्रीकरणाला अलीकडेच सुरुवात झाली आहे. मालिकेमधील आणखी एका रोमांचपूर्ण अध्‍यायाचा उलगडा होताना पाहायला मिळण्‍यासोबत प्रेक्षकांना अभिनेता शोएब कबीरचा मालिकेमध्‍ये प्रवेश पाहायला मिळणार आहे. 

आपला आनंद व्‍यक्‍त करत शोएब कबीर म्‍हणाला, ''डॉ. आंबेडकरांची पुस्‍तके व कार्यांनी मला खूप प्रेरित केले आहे. मी त्‍यांच्‍याबाबत भरपूर वाचत मोठा झालो आहे. मी कधीच विचार केला नव्‍हता की, एकेदिवशी मला त्‍यांच्‍यावर आधारित असलेल्‍या मालिकेचा भाग बनण्‍याची संधी मिळेल. हा माझ्यासाठी अभिमानास्‍पद व सन्‍माननीय क्षण आहे. मी मालिकेमध्‍ये भास्‍करच्‍या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे. मालिकेमधील माझा प्रवेश भीमाबाई व रामजी यांच्‍या कुटुंबामधील अनेक अध्‍यायांचा उलगडा करेल. ही भूमिका बाबासाहेबांवर कोणता प्रभाव आणि त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये कोणता गोंधळ निर्माण करते हे जाणून घेण्‍यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल.'' 

बाबासाहेबांनी विविध संघर्षांचा सामना केला, ज्‍यामुळे त्‍यांचे जीवन पूर्णत: बदलून गेले. त्‍यांचा मोठा आधारस्‍तंभ, मार्गदर्शक असण्‍यासोबत त्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेली व्‍यक्‍ती म्‍हणजे त्‍यांचे वडील रामजी सकपाळ. पण भीमराव बालविवाहाच्‍या समस्‍येसंदर्भात त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या निर्णयाविरोधात जाण्‍याचे ठरवतात तेव्‍हा वडील व मुलासमोर आव्‍हानात्‍मक क्षण समोर उभे राहते. ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ ही मालिका बाबासाहेबांचा वयाच्‍या पाचव्‍या वर्षांपासूनचा ते भारतीय संविधानाचे शिल्‍पकार बनण्‍यापर्यंत प्रवास सांगणारी प्रेरक कथा आहे. 

0