आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही सेलेब्समध्ये कोरोना:टीव्ही अभिनेत्री दिव्याच्या वडिलांचे निधन, महिनाभर कोविड - 19 सोबत झुंज दिल्यानंतर मालवली प्राणज्योत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्याच्या वडिलांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला.

टीव्ही अभिनेत्री आणि व्हीजे दिव्या अग्रवालचे वडील संजय अग्रवाल यांचे बुधवारी कोविड 19 मुळे निधन झाले. दिव्याने सोशल मीडियावर ही माहिती देताना आपल्या वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट केली आणि सोबतच त्यांचा एक फोटो शेअर केला. दिव्याने लिहिले, 'तुम्ही कायम आमच्यासोबत राहाल. आय लव्ह यू पापा, रेस्ट इन पीस.'

दिव्याचे वडील गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांना हृदयरोग होता. एक महिना कोरोनाशी झुंज दिल्यानंतर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिव्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना वडिलांसाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होती. काही दिवसांपूर्वीच सर्वप्रथम तिचा भाऊ प्रिन्सचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती.

View this post on Instagram

You are always with me... i love you papa.. RIP

A post shared by D I V Y A A G A R W A L (@divyaagarwal_official) on Oct 27, 2020 at 8:41pm PDT

सेलेब्रिटींनी शोक व्यक्त केला

दिव्याच्या वडिलांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. दिव्याचा प्रियकर वरुण सूदनेही त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अभिनेत्री नेहा धुपिया हिनेदेखील दिव्याचे सांत्वन करताना लिहिले की, या कठीण काळात देव तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. याशिवाय अली गोनी, आर्य बब्बर, निवेदिता बसू यांनीही दिव्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

स्प्लिट्सविलातून मिळाली ओळख

2015 मध्ये दिव्याची मिस नवी मुंबई म्हणून निवडली झाली होती. तिने एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला या कार्यक्रमाच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर डेब्यू केला होता. या शोमधून तिला ओळख मिळाली होती. ती या शोची रनरअप ठरली होती. याकाळात ती शोचा विनर प्रियांक शर्मासोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आली होती.

बातम्या आणखी आहेत...