आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Actress Anita Hassanadani Blessed With A Baby Boy, Her Husband Rohit Reddy Shares This Good News On Social Media With Fans

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला:अनीता हसनंदानीने दिला मुलाला जन्म, पती रोहित रेड्डीने पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी; लिहिले - 'ओह बॉय'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनीता 21 वर्षांपासून करत आहे एंटरटेन

टीव्ही अभिनेत्री अनीता हसनंदानी आई बनली आहे. तिने मंगळवारी (9 फेब्रुवारी) मुलाला जन्म दिला. याची माहिती 'नागिन' सीरियल फेम अनीताचा पती रोहित रेड्डीने स्वतः रात्री उशीरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले, 'ओह बॉय' अनीता-रोहित लग्नाच्या 8 वर्षांनंतर पहिल्यांदा पॅरेंट्स बनले आहेत. या दोघांचे लग्न 14 ऑक्टोबर 2013 मध्ये झाले होते. याच्या पूर्वी तीन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते.

रोहितने जे फोटो शेअर केले आहे, त्यामध्ये तो पत्नी अनीताच्या गालावर किस करताना दिसतोय. तर अनीता बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. फोटोच्या खाली डेट लिहिली आहे, 9 फेब्रुवारी 2021. यासोबतच 'इट्स ए बॉय' असेही लिहिले आहे. रोहितची ही पोस्ट समोर आल्यानंतर सेलेब्ससह चाहते या दोघांना शुभेच्छा देत आहे.

अक्टोबर 2020 मध्ये केली होती पॅरेंट्स होणार असल्याची अनाउंसमेंट
अनीता आणि रोहित यांनी 14 ऑक्टोबर 2020 ला एक व्हिडिओ शेअर करत पॅरेंट्स बनत असल्याची अनाउंसमेंट केली होती. व्हिडिओमध्ये कपलने पहिली भेट, साखरपूडा, लग्नाला रीक्रिएट करत नंतर प्रेग्नेंसीविषयी सांगितले होते.

अनीता 21 वर्षांपासून करत आहे एंटरटेन
अनीता हसनंदानी जवळपास 21 वर्षांपासून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे. तिने 'ताल' चित्रपटातून डेब्यू केला होता. ज्यानंतर ‘कृष्णा कॉटेज’ आणि ‘कुछ तो है’सारख्या चित्रपटामध्ये दिसली. अनीताने चित्रपटांसोबतच टेलीव्हिजन इंडस्ट्रीमध्ये ‘हरे कांच की चूड़ियां’मधून डेब्यू केला होता. यानंतर ती ‘सौतन कभी सहेली’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’, 'नागिन' सह अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...