आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिता हसनंदानीचा बर्थडे:तेलुगु चित्रपटाद्वारे केले होते पदार्पण, टेलिव्हिजन ते बॉलिवूडपर्यंत बनवली स्वतःची वेगळी ओळख, वयाच्या 40 वर्षी झाली आई

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 एप्रिल 1981 रोजी मुंबईत अनिताचा जन्म झाला.

टीव्ही मालिका 'ये है मोहब्बतें' फेम अनिता हसनंदानी हिचा आज 40 वा वाढदिवस आहे. अनिताने मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केली. एव्हर यूथ, सनसिल्क, बोरोप्लससह अनेक नामांकित ब्रॅण्ड्साठी तिने मॉडेलिंग केले. मॉडेलिंगमध्ये यशस्वी ठरल्यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. अनिताने आपल्या लॉकडाउन बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

14 एप्रिल 1981 रोजी मुंबईत अनिताचा जन्म झाला. अनिताला नताशा नावानेही ओळखले जाते. तिने हिंदीशिवाय तेलुगु, कन्नड, तामिळ, पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फॅशनच्या जगतात नाव कमावल्यानंतर तिने 'नुव्वु नेनू' (2001) या तेलुगु चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.

या टीव्ही शो आणि चित्रपटांमधून झाली लोकप्रिय
अनिताने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात बालजी टेलिफिल्म्सच्या 'कभी सौतन कभी सहेली' (2001) या मालिकेद्वारे केली होती. मात्र तिला खरी लोकप्रियता 'काव्यांजली' या मालिकेतील अंजली नंदा या भूमिकेने मिळवून दिली. 'कयामत', 'कसम से', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'क्या दिल में है', 'कहानी हमारे महाभारत की', 'अनहोनियां का अंधेरा'सह अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतील 'शगून' या पात्रामुळे अनिताला भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. अनिताने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'कुछ तो है' (2003), 'ये दिल' (2003), कृष्णा कॉटेज (2004), 'सिलसिले' (2005), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'हीरो' (2015) या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

2013 मध्ये अडकली लग्नगाठीत
बिझनेसमन रोहित रेड्डीसोबत अनिताचे लग्न झाले आहे. 14 ऑक्टोबर 2013 रोजी दाक्षिणात्य पद्धतीने अनिता रोहितसोबत लग्नगाठीत अडकली. गोव्यात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नात पारंपरिक रुपात अनिता खूप सुंदर दिसली होती. अनिताची जवळची मैत्रीण आणि निर्माती एकता कपूर तिच्या लग्नात हजर होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटी अनिताच्या लग्नात उपस्थित होते. गोव्यात तीन दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्यात करणवीर बोहरा, श्वेता साळवे, मेघना नायडू, अंजना सुखानीसह बरेच सेलेब्स आले होते. अनिता आणि रोहितची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. तीन ते चार वर्षे डेटिंग केल्यानंतर 2013 मध्ये हे दोघे लग्नगाठीत अडकले.

आधी टीव्ही अॅक्टरला डेट करत होती अनिता
'काव्यांजली' (2005-06) च्या सेटवर अनिता आणि अभिनेता एजाज खान यांच्या अफेअरची चर्चा होती. दोघांचे 2010 मध्ये ब्रेकअप झाले. त्याचे कारण एजाजची कॅनेडियन सिंगर नताली डीसोबत वाढती जवळीक होती.

वयाच्या 40 व्या वर्षा झाली आई
अनिताने लेट प्रेग्नेंसीला प्राधान्य दिले आणि वयाच्या 40 व्या वर्षी ती आई झाली. 9 फेब्रुवारी 2021 रोजी तिने मुलाला जन्म दिला. तिने आपल्या मुलाचे नाव आरव ठेवले आहे. अनिता सध्या मॅटर्निटी लिव्ह असून सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...