आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:‘मेरे साई’ मालिकेत अभिनेत्री छाया कदमची एंट्री, म्हणते - ही भूमिका मिळणे म्हणजे खुद्द देवानेच दिलेला एक संकेत आहे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मेरे साई’ मालिकेत दाखवण्यात येणारे आगामी कथानक हे साई चरित्रातील एक महत्त्वाचे कथानक आहे.

“माझे वडील जर आज जिवंत असते, तर मेरे साई मालिकेचा मी एक भाग झाल्याचे पाहून त्यांना खूप अभिमान वाटला असता”, असे अभिनेत्री छाया कदमचे हे म्हणणे आहे. सैराट, न्यूड्स आणि अंधाधुनसारख्या नावाजलेल्या चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांबद्दल छाया कदम ओळखली जाते. मेरे साई मालिकेतील आगामी कथानकात ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

मेरे साई –श्रद्धा और सबुरी या मालिकेने अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. यात दाखवण्यात येणारे आगामी कथानक हे साई चरित्रातील एक महत्त्वाचे कथानक आहे. त्यामध्ये घरातील वयोवृद्धांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

या मालिकेचा एक भाग होण्यातला आपला आनंद व्यक्त करताना छाया कदम म्हणते, “या मालिकेचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे आणि धन्यता देखील वाटते आहे, कारण माझे आई-वडील साईंचे परम भक्त आहेत. माझे वडील तर शिर्डीचे एक ट्रस्टी होते. मला वाटते की, मेरे साई मालिकेत काम करण्याची संधी चालून येणे हा खुद्द देवानेच दिलेला संकेत आहे.”

या मालिकेतील आगामी कथानक खूप संवेदनशील असून ती एका विधवा स्त्रीची, सरस्वतीची कहाणी आहे. घरातून बाहेर काढण्यात आलेली सरस्वती राहण्यासाठी आसरा शोधत असते. तिला साई भेटतात आणि ते तिच्या सर्व समस्या दूर करतात आणि जीवनाचा मार्ग दाखवतात. ही एका टाकलेल्या विधवेची गोष्ट आहे, जिला साईंनी केलेल्या चमत्कारामुळे घर मिळते.

बातम्या आणखी आहेत...