आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळा अनुभव:अभिनेत्री ग्रेसी सिंगने सीनसाठी कुशलतेने वाजवली वीणा, म्‍हणली - 'वीणा वाजवण्‍याचा आत्‍मीय अनुभव होता'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रेसी नुकतेच सितार वाजवण्‍याच्‍या कलेमध्‍ये निपुण झाली.

नुकतेच, एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मधील संतोषी माँ (ग्रेसी सिंग) भक्तिभावाने वीणा वाजवताना दिसली. ग्रेसी नुकतेच सितार वाजवण्‍याच्‍या कलेमध्‍ये निपुण झाली आणि अल्‍पावधीतच तिने वीणा वाजवण्‍याचे ज्ञान देखील घेतले. तिला वीणा वाजवायची होती, पण तिने अगदी कुशलतेने वीणा वाजवली, ज्‍यामुळे सर्व कलाकार व टीम अचंबित झाले.

संतोषी माँची भूमिका साकारणारी ग्रेसी म्‍हणाली, ''शास्‍त्रीय संगीत माझ्यामध्‍ये सामावलेले आहे आणि वीणा वाजवण्‍याचा आत्‍मीय अनुभव होता. मी मोकळ्या वेळेमध्‍ये सितार वाजवते, जे नुकतेच वीणा वाजवण्‍याच्‍या संदर्भात खूपच फायदेशीर ठरले. सीनमध्‍ये संतोषी माँ पृथ्‍वीलोकमध्‍ये घडलेल्‍या सकारात्‍मक घटनांमुळे आनंदित होते आणि म्‍हणूनच ती वीणा वाजवत तिचा आनंद व्‍यक्‍त करते. सीन योग्‍य वठवण्‍यासाठी मी खरे वाद्य वाजवण्‍याचा प्रयत्‍न केला तेव्‍हा मी माझा आनंद लपवू शकले नाही. वीणाचा आवाज अत्‍यंत आध्‍यात्मिक आहे. हा आवाज ऐकून मी पूर्णत: वेगळ्या विश्‍वामध्‍ये गेले.''

ती पुढे म्हणाली, ''दैवी वाद्य वाजवणे सोपे नाही. मला माझ्या गुरूजींच्‍या शिकवणी आठवल्‍या आणि अवधान, फोकससह वीणा योग्‍यरित्‍या वाजवली. वीणाच्‍या मधुरमय आवाजाचा शास्‍त्रीय संगीताचे निस्‍सीम चाहते व प्रेमी भरपूर आनंद घेतात. हा क्षण माझ्या कायमच स्‍मरणात राहिल. मी आशा करते की, माझे चाहते मी प्रयत्‍न केलेल्‍या काहीतरी नवीन गोष्‍टींचा आनंद घेतील. संतोषी माँच्‍या भूमिकेने मला माझ्या आध्‍यात्मिक बाजूशी जुडण्‍यामध्‍ये आणि त्‍याकडे अधिक लक्ष देण्‍यामध्‍ये मदत केली आहे.''