आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है'मध्ये अलीकडेच अनिता भाभीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा पेंडसेची एंट्री झाली आहे. अल्पावधीतच तिने या भूमिकेतून लोकप्रियता मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नेहासोबत विविध विषयावर संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी तिने तिच्यासाठी प्रेरणास्थानी असलेल्या महिलांविषयी सांगितेल. सोबतच आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन कसा आहे, यावरही ती व्यक्त झाली.
मी अनेक महिलांना पाहते आणि त्या स्वत:ला कशाप्रकारे पुढे घेऊन जातात व स्वावलंबीपणे जीवन जगतात यासाठी त्यांचे कौतुक करते. हिना खान ही या टेलिव्हिजन क्षेत्रातील अशीच एक महिला आहे. ती अत्यंत धाडसी महिला आहे, जी तिच्या अधिकारांसाठी लढते आणि मला तिचे हे गुण खूप आवडतात. आणखी एक महिला आहे दिव्यांका त्रिपाठी, जी मला प्रेरित करते. त्या कुशल आहेत आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या व मनाच्या खूप जवळ असलेल्या समस्यांविरोधात आवाज उठवतात. मी प्रशंसा करणारी आणखी एक महिला आहे एकता कपूर. तिचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रबळ असून ती धाडसी व महत्वाकांक्षी आहे. तिने या क्षेत्रामध्ये तिचे नावलौकिक केले आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, माझे लग्न 2020 मध्ये झाले, ज्यामुळे मी लगेचच काम करण्यास उत्सुक नव्हते. मला माझ्या जोडीदारासोबत वेळ व्यतित करण्यासाठी काहीसा मोकळा वेळ पाहिजे होता. सुदैवाने आर्थिक मंदीचा माझ्यावर कोणताच परिणाम झाला नाही. लग्न करण्याचा निर्णय मी स्वत:हून घेतला होता. पण मला माझ्या अवतीभोवती असलेल्या लोकांना सामना कराव्या लागलेल्या आव्हानात्मक स्थितीबाबत माहित आहे. मी काम करत नसताना देखील घरी राहून कंटाळले होते, पण घरी राहणे आवश्यक होते. माझ्यासाठी 2020 मधील मोठी शिकवण म्हणजे आव्हानात्मक काळामध्ये देखील आशावादी राहणे आणि काम करण्यासोबत एकमेकांचा आधार बनणे.
माझ्या मते, याबाबत वय महत्त्वाचे नसून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. महिलेला तिचे अधिकार माहित असले पाहिजेत आणि त्या अधिकारांना कृतीत आणण्याची शक्ती व धैर्य असले पाहिजे. नेहमी स्वत:वर विश्वास ठेवा, दुस-यांना निर्णय घेऊ देऊ नका आणि मनापासून बोला. तुमचा आवाज उठवा. आपण राहत असलेल्या समाजामध्ये आपल्यावर अधिकार गाजवणा-या व्यक्ती म्हणजे पालक, जोडीदार किंवा भाऊ. आपण आपला विश्वास असलेल्या गोष्टीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि आपल्या विचारांना व्यक्त केले पाहिजे. मी माझ्या थो़डे उशीरा लग्न केले, कारण माझ्यामध्ये मला सूट न होणा-या गोष्टींना नाही म्हणण्याचे धैर्य होते. लोकांनी मला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत फक्त स्वत:कडे लक्ष दिले. मी अविवाहित असल्याचे म्हणणे अवघड होते, पण मी हताश होऊन न जाण्याचे आणि दुस-यांनी ठरवलेल्या नात्यामध्ये गुंतून न जाण्याचे ठरवले. शेवटी, हे माझे आयुष्य आहे आणि मी ते माझ्यापरीने जगेन. मी दुसरे माझ्यासाठी काय शोभेल याबाबत करत असलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करते.
अनिता भाभी ही समकालीन व आजच्या काळातील महिला आहे. ती एक प्रेरणा स्रोत आहे, कारण ती स्वत:चा विचार करते आणि स्वत:च्या जीवनाकडे लक्ष देते. अनिता भाभी धाडसी आहे आणि विश्वास असलेल्या गोष्टीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. ती लवकर निराश होत नाही. प्रेक्षक तिच्या या गुणांची प्रशंसा करतात. प्रेक्षक, विशेषत: महिला प्रेक्षक तिच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. ती हुशार महिला आहे आणि मला तिचे हे गुण खूप आवडतात. हेच अनिता व माझ्यामध्ये साम्य आहे. प्रेक्षक अशा प्रबळ महिलांकडे त्वरित आकर्षित होण्यासोबत त्यांची प्रशंसा व कौतुक देखील करतात.
महिलेमध्ये विश्वात वादळ निर्माण करण्याची क्षमता आहे. संपूर्ण विश्वाला तिची क्षमता, शक्ती व नीडरपणाबाबत माहित आहे. महिलांना हरवणे सोपे नाही. माझ्या मते, महिलांमध्ये सामजिक बदल घडवून आणण्याची आंतरिक क्षमता आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि ते करत असलेल्या प्रत्येक कार्यामध्ये संयम, चिकाटी आहे. खडतर कामे सावधपणे करण्यासाठी परिश्रम व क्षमता असण्यामध्ये खरी शक्ती सामावलेली आहे.
मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, आवाज उठवणे आणि स्वत:चे विचार व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा स्वार्थीपणा नाही, तर आपला विश्वास असलेल्या गोष्टीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि ते कार्य पूर्ण केले पाहिजे. नेहमी डोळे व कान उघडे ठेवा, जागरूक राहा आणि तुम्ही कोण आहात व जीवनामध्ये काय पाहिजे हे व्यक्त करा. स्वावलंबी बना आणि नेहमी स्वत:चे ऐका!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.