आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रीतिकाला जामीन:अभिनेत्री प्रीतिका चौहानला मुंबई कोर्टाकडून जामीन मंजूर, NCB ने 4 दिवसांपूर्वी 99 ग्रॅम गांजासह केली होती अटक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 दिवसांपूर्वी प्रीतिकाला रंगेहात पकडले होते

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) 25 ऑक्टोबर रोजी टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिला अटक केली होती. आता तिला जामीन मिळाला आहे. याप्रकरणी प्रीतिकासह आणखी 5 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना 8 नोव्हेंबरपर्यंत रिमांडवर पाठवण्यात आले होते. त्यातील फैजल नावाच्या व्यक्तीलाही जामीन मिळाला आहे.

4 दिवसांपूर्वी प्रीतिकाला रंगेहात पकडले होते

एनसीबीने शनिवारी आरोपी प्रीतिका चौहान आणि फैजल शेख यांना मुंबईतील वर्सोवा येथून अटक केली होती. एनसीबीने टांझानियाचा नागरिक ब्रूनो जॉन, रोहित डायमंड आणि त्यांच्यासह आणखी एका आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून एनसीबीने चरस, गांजा, कोकेन आणि रोख रक्कम जप्त केली होती.

प्रीतिका चौहान हिमाचल प्रदेशची रहिवासी आहेत. 2015 मध्ये तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'संकंट मोचन हनुमान', 'सावधान इंडिया' आणि 'जगत जनानी माँ वैष्णो देवी' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

एनसीबीचा तपास सुरु आहे

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणा-या एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली आहे. या पथकाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपश सावंत, ड्रग पेडलर जैद, बासित परिहार, धर्मा प्रोडक्शनचे माजी निर्माता क्षितिज रवि प्रसाद यांच्यासह 23 आरोपींना अटक केली होती.