आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीव्ही अपडेट:'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये अभिनेत्री सारा खानची एंट्री, साकारणार निगेटिव्ह रोल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये सारा पौलोमीच्‍या भूमिकेत दिसणार आहे.

'भक्‍त व भगवान' यांच्‍यामधील निर्मळ नातं दाखवणारी 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' ही मालिका नवीन एपिसोड्ससह सुरू झाली आहे. मालिकेमध्‍ये आता अभिनेत्री सारा खान नकारात्‍मक भूमिकेत प्रवेश करणार आहे. ती मालिकेमधील सर्वात मोठी शत्रू पौलोमीची भूमिका साकारणार आहे, जी संतोषी माँ (ग्रेसी सिंग) आणि तिची निस्‍सीम भक्‍त स्‍वाती (तन्‍वी डोगरा) यांच्‍या जीवनांमध्‍ये अनेक अडथळे निर्माण करणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सारा खान म्‍हणाली, ''मी नेहमीच गूढ भूमिका साकारण्‍यास उत्‍सुक असते. दैवी भूमिका पडद्यावर आणणा-या शोभा व पवित्राने मला नेहमीच आकर्षून घेतले आहे. प्रेक्षकांना मालिकेमधील पौलोमी भूमिकेबाबत माहित आहे. पण मी नवीन एपिसोड्समध्‍ये कशाप्रकारे यापूर्वी दिसण्‍यात न आलेला ड्रामा घडवून आणते हे पाहणे रोमांचक असणार आहे.'' ती पुढे म्‍हणाली, ''माझी भूमिका पौलोमी स्‍वाती व तिच्‍या पतीला हानी पोहोचवण्‍यासाठी जीवनास धोकादायक अशी कृत्‍ये करणार आहे आणि संतोषी माँच्‍या सर्व शक्‍ती काढून घेण्‍यासाठी कटकारस्‍थान देखील रचणार आहे. यामुळे शक्‍ती नसलेल्‍या संतोषी माँवर मोठा दबाव असणार आहे. स्‍वातीला संकटामधून बाहेर काढण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी माँला अशक्‍य होणार आहे. मी माझ्या भूमिकेसाठी उत्‍सुक असून अँड टीव्‍ही आणि 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'च्‍या कलाकारांसोबत या अद्भुत प्रवासासाठी देखील उत्‍सुक आहे.''

नवीन नियमांशी जुळवून घेण्‍याबाबत विचारले असता सारा म्‍हणाली, ''नवीन नियम लागू होत असताना मला वाटते की, आपण सर्वांनी या नवीन नियमांशी जुळवून घेतले पाहिजे. आम्‍ही सर्वांनी शूटिंगसाठी आखण्‍यात आलेल्‍या या नवीन नियमांशी जुळवून घेतले पाहिजे. हे आपल्‍या आणि आपल्‍या सभोवती असलेल्‍या इतरांच्‍या सुरक्षिततेसाठी आहे. प्रॉडक्‍शन हाऊस प्रत्‍येकाच्‍या सुरक्षिततेसाठी अधिक खबरदारी व सॅनिटायझेशन उपाय घेत आहे. मी देखील आवश्‍यक खबरदारी घेण्‍यासाठी सोबत माझे सेफ्टी व मेकअप किट ठेवते.''