आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अपडेट:अभिनेत्री शिल्पा तुळसकरची 'मेरे साई' मालिकेत एंट्री, द्वारकामाईतून साईंना पोलिसांनी अटक केल्यानंतर काय घडणार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मेरे साई' मालिकेच्या आगामी भागात वसुंधराची गोष्ट बघायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा तुळसकर 'मेरे साई- श्रद्धा और सबुरी' मालिकेतील पुढील भागात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि अनेक लोक श्रद्धेने ही मालिका पाहतात. आगामी गोष्ट ही साई चरित्रातील एक मोठी गोष्ट आहे. साईंना जेव्हा अटक झाली होती आणि जी एक मोठी कलाटणी देणारी घटना होती, त्याचे चित्रण या कथेतून करण्यात येईल.

या मालिकेचा एक भाग होतानाचा आनंद व्यक्त करताना शिल्पा तुळसकर म्हणते, “फेब्रुवारीत मी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत शिर्डीला गेले होते आणि मार्चपासून मी दर गुरुवारी साई चरित्र वाचू लागले. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की त्यानंतर सात महिन्यांनी लॉकडाउननंतर मी मेरे साई मालिकेतून पुन्हा काम सुरू करते आहे. मी 17 वर्षांची असल्यापासून तुषार दळवीला ओळखते आणि आता पुन्हा त्याच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

मालिकेतील यापुढचे कथानक खूप महत्त्वाचे आणि मनाला व्यथित करणारे आहे. पोलिसांनी द्वारकामाई येथे साईंना अटक केली होती, ती गोष्ट यात आहे. या गोष्टीत शिल्पा तुळसकर अभिनीत वसुंधरा हिला एक मूल आहे आणि साईंवरील तिच्या नितांत भक्तीमुळे साईंबद्दल चमत्कार घडताना ती पाहते आणि त्यामुळे तिला स्वतःच्या जीवनातील समस्यांशी लढण्याचे बळ मिळते.

बातम्या आणखी आहेत...