आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्येष्ठ गायका उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन बुधवारी (2 डिसेंबर) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदित्यच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे देखील या रिसेप्शनला पोहोचले. ड्रग्जच्या प्रकरणात अडकल्यानंतर भारती आणि हर्ष पहिल्यांदाच पब्लिकली समोर आले.
भारती आणि हर्ष यांनी रिसेप्शनमध्ये एन्जॉय केले. दोघांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नाचताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणावरुन भारती-हर्षच्या या व्हिडिओवर लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या दोघांनाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 21 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. वृत्तानुसार, एनसीबीने छापा टाकून त्यांच्या घरातून 86.50 ग्रॅम गांजा जप्त केला होता. यानंतर या दोघांनाही 15 हजारांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयात जामीन मिळाला होता. सध्या हे दोघेही जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत.
गोविंदा, त्यांची पत्नी सुनीता आणि मुलेही आदित्यच्या रिसेप्शनमध्ये दिसले.
रिसेप्शनमध्ये उदित नारायण आणि त्यांची पत्नी दीपा यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटातील लोकप्रिय गाणे 'मेहंदी लगा के रखना'वर डान्स केला.
तर आदित्यने सलमान खानच्या चित्रपटातील 'तेरे घर आया' या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. त्याने श्वेतासोबत एक रोमँटिक डान्ससुद्धा केला. व्हिडिओमध्ये श्वेता रेड कलरच्या गाऊनमध्ये दिसतेय, तर आदित्य नारायण ब्लॅक सूटमध्ये दिसत आहे.
रिसेप्शनपूर्वी आदित्यच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदित्य आणि श्वेता यांची भेट ‘शापित’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.