आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाचा रंजक किस्सा:आदित्य नारायण म्हणाला- वरमाला घालताना अचानक माझा पायजामा फाटला, मग मित्राचा पायजामा घालून घेतल्या सप्तपदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य-श्वेता वेगळ्या घरात शिफ्ट होतील

ज्येष्ठ गायिका उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत विवाहबद्ध झाला. लग्नानंतर एका मुलाखतीत आदित्यने त्याच्या लग्नातील एक रंजक किस्सा शेअर केला आहे. त्याने सांगितल्यानुसार, ऐन वरमाला घालताना त्याचा पायजामा फाटला होता आणि त्यानंतर त्याने मित्राचा पायजामा घालून लग्नाच्या इतर विधी पूर्ण केल्या होत्या.

'माझ्या मित्राचा आणि माझा पायजामा एकसारखा होता'
स्पॉटबॉयशी बोलताना आदित्य म्हणाला, "वरमाला घालताना अचानक माझ्या काही मित्रांनी मला वर उचलले, नेमका त्याचवेळी माझा पायजामा फाटला. त्यानंतर सप्तपदीवेळी मला माझ्या मित्राचा पायजामा घालावा लागला होता. सुदैवाने माझा आणि माझ्या मित्राचा पायजामा एकसारखा होता. "

आदित्य-श्वेता वेगळ्या घरात होतील शिफ्ट
या मुलाखतीत आदित्यने पुढे सांगितले की, "मी अंधेरीत 5 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. माझे हे नवीन घर माझ्या आईवडिलांच्या घरापासून अगदी तीन इमारती सोडून आहे. पुढील 3-4 महिन्यांत आम्ही तिथे शिफ्ट होऊ. माझे आईवडील आमच्यापासून काही पाऊलच दूर असतील." आदित्यने सांगितल्यानुसार, त्याने आपले नवीन घर अनेक वर्षांच्या बचतीमधून खरेदी केले आहे.

आदित्य-श्वेताने मंदिरात केले लग्न

आदित्य आणि श्वेता यांनी 1 डिसेंबरला जुहूच्या इस्कॉन मंदिरात लग्न केले. कोरोनामुळे, लग्नात वर आणि वधूच्या कुटुंबासह जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळून फक्त 50 लोक सहभागी झाले होते. आदित्य-श्वेताच्या लग्नाचे रिसेप्शन 2 डिसेंबर रोजी मुंबईत झाले होते, ज्यात भारती सिंग, हर्ष लिंबाचिया आणि गोविंदा यांच्यासह अनेक सेलेब्रिटी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser