आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने 3'चे 18 क्रू मेंबर्स कोविड पॉझिटिव्ह असल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. आता या शोचा परीक्षक धर्मेश येलांडे यालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. कोविड 19 च्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर धर्मेश त्याच्या गोव्यातील घरी होम क्वारंटाइनमध्ये आहे. या शोच्या पुढील भागात आता धर्मेशची जागा कोरिओग्राफर शक्ती मोहन आणि पुनीत जे पाठक घेणार आहेत.
धर्मेशची गोव्यात झाली होती कोरोनाची चाचणी
'डान्स दीवाने 3' या शोचे निर्माते अरविंद राव यांनी धर्मेश कोविड पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. अरविंद यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र आता ते हळूहळू बरे होत आहेत. ते म्हणाले, 'गेल्या आठवड्यात धर्मेश जेव्हा त्याच्या घराच्या नूतनीकरणासाठी गोव्याला गेला होता तेव्हा त्याची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली होती. 5 एप्रिलला तो शूटसाठी परतणार होता. पण चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाला कोरोना चाचणी घ्यायची होती.'
अरविंद पुढे म्हणाले, 'धर्मेशने गोव्यात आणखी एक चाचणी केली आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, म्हणून आम्ही पुढच्या भागासाठी शक्ती मोहन आणि पुनीत जे पाठक यांना आणण्याचे ठरविले. त्यांनी माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांच्यासह या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले आहे.'
माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचा अहवाल निगेटिव्ह आला
कोरोनाची लागण होऊन त्यातून बरे झाल्यानंतर आपल्या प्रकृतीविषयी बोलताना अरविंद राव म्हणाले, 'मी रिकव्हर होतोय.आणि तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा कोविड 19 ची चाचणी करणार आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, तर कामावर परतेल. गेल्या आठवड्यात काही क्रू मेंबर्स पॉझिटिव्ह आले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तेदेखील या आठवड्याभरात बरे होतील. आम्ही सर्वांनी सुरक्षा प्रोटोकॉल पाळले आहेत.'
अरविंद म्हणाले, 'कोविडच्या चाचणीशिवाय आम्ही कोणत्याही सदस्याला सेटवर येऊ देत नाही. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही कमी लोकांसोबत काम करत आहोत. नियमानुसार माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांनीदेखील शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी कोविडची चाचणी करुन घेतली होती. दोघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आशा आहे की धर्मेश लवकरच बरा होईल आणि पुन्हा शोमध्ये परतेल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.