आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • After Abhay Deol, Now Shilpa Shinde Raised Voice On Nepotism And Discrimination In Industry, Said I Have Suffered All This

नेपोटिजमवर वाद:अभय देओलनंतर आता शिल्पा शिंदेने इंडस्ट्रीत होणा-या भेदभाव आणि घराणेशाहीवर उठवला आवाज, म्हणाली  - 'मी हे सर्व सहन केले आहे'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभय देओलने देखील त्याचा राग व्यक्त केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. येथे ब-याच जणांवर घराणेशाही चालवत असल्याचा आरोप आहे तर काही जण गटबाजी करत असल्याचेही म्हटले जात आहे. याविषयी बोलताना बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे हिनेही आपली आपबिती शेअर केली आहे. 

आज तकला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने सांगितले की, केवळ बॉलिवूडच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही आहे. तिच्या मते, अभिनेताचा मुलगा अभिनेता आणि डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच बनेल. शिल्पासाठी नेपोटिजमचा मुद्याला आधार नाही, पण इंडस्ट्रीत भेदभाव होत असल्याची तिने कबुली दिली आहे.

इंडस्ट्रीत होणा-या भेदभावाविषयी शिल्पा म्हणाली, मी स्वत: याचे एक उत्तम उदाहरण आहे. लोक आपापसात म्हणायचे की माझ्याबरोबर काम करु नका. प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनलने माझ्यावर 2 वर्षे बंदी घातली होती. मला वारंवार नोटिसा मिळायच्या की, माझ्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होत आहे, ज्यामुळे मला नुकसानभरपाई द्यावी लागेल. भाभीजी घर पर है या मालिकेदरम्यान जे काही घडले त्यावरून मी खूप अस्वस्थ होते, असे तिने सांगितले. 

कुणालाही माझी अडचण समजली नाही: शिल्पा

शिल्पा शिंदे म्हणाली, या काळात मी डोकेदुखीच्या 3 ते 4 गोळ्या खायची, ज्यामुळे मी 9 तास झोपायचे. मी माझ्या घरात लपून बसत असे. शोच्या निर्मात्यांनी बरेच तमाशे केले होते. याकाळात मी खूप अस्वस्थ होते पण कोणालाही ते समजले नाही.

दुसरीकडे शिल्पानेही शोच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले. प्रदीर्घ वादानंतर शिल्पावर सिने आर्टिस्ट असोसिएशनने दोन वर्षे बंदी घातली. यानंतर ही अभिनेत्री बिग बॉस 11 ची विजेतीही होती. त्यानंतर शिल्पा आतापर्यंत कोणत्याही शोमध्ये दिसली नाही. 

अभय देओलनेदेखील शेअर केली आपबीती 

शुक्रवारी आपल्या चित्रपटाचा फोटो शेअर करुन अभय देओलने देखील त्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाच्या वेळी घडलेल्या गोष्टी सांगितल्या आहे. पोस्टमध्ये त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटातील एक सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल उभे असल्याचे दिसत आहे.  

“Zindagi Na Milegi Dobara”, released in 2011. Need to chant this title to myself everyday nowadays! Also a great watch when anxious or stressed. I would like to mention that almost all the award functions demoted me and Farhan from main leads, and nominated us as “supporting actors”. Hrithik and Katrina were nominated as “actors in a leading role”. So by the industry’s own logic, this was a film about a man and a woman falling in love, with the man supported by his friends for whatever decisions he takes. There are many covert and overt ways in which people in the industry lobby against you. In this case it was shamelessly overt. I of course boycotted the awards but Farhan was ok with it. #familyfareawards Very creative artwork @kalakkii

A post shared by Abhay Deol (@abhaydeol) on Jun 19, 2020 at 3:15am PDT

  ‘त्यावेळी प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्याच्या नॉमिनेशनमध्ये वगळण्यात आले आणि आम्हाला फक्त सहाय्यक अभिनेता म्हणून नॉमिनेट करण्यात आले. तर हृतिक आणि कतरिनाला मुख्य भूमिकेसाठी नॉमिनेट करण्यात आले. त्यानंतर मी पुरस्कारावर बहिष्कार टाकला पण जे काही सुरु होते त्याचा फरहानला फरक पडला नाही’ असे अभयने पुढे म्हटले आहे.

0