आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • After Disha Vakani, Neha Mehta Left Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Show, Playing Anjali For The Last 12 Years

कन्फर्म:दिशा वकानीनंतर आता नेहा मेहताने सोडली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका, मागील 12 वर्षांपासून साकारत होती अंजलीची व्यक्तिरेखा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माते आता नवीन अंजलीचा शोध सुरू करतील.

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतून गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्री दिशा वकानी बाहेर आहे. दिशाच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या मालिकेला आणखी एका अभिनेत्रीने रामराम ठोकला आहे. या मालिकेत अंजली भाभीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 12 वर्षांपासून या मालिकेचा महत्त्वाचा भाग असलेल्या नेहाने आपला राजीनामा निर्मात्यांना दिला आहे.

तारक मेहता या मालिकेत नेहाने तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. स्पॉटबॉयच्या सूत्रांच्या माहितीनुसार नेहाने ही मालिका सोडण्याचा निर्णय निर्मात्यांना सांगितला असून तिच्या सहकलाकारांना यासंदर्भात काहीही माहिती नाही. निर्माते नेहाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती आपल्यानिर्णयावर ठाम आहे.

  • करियर ग्रोथसाठी घेतला निर्णय

रिपोर्टनुसार, नेहाने हा निर्णय आपल्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळवण्यासाठी घेतला आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून नेहा एकाच व्यक्तिरेखेत दिसत आहे. अशा परिस्थितीत काहीतरी नवीन करण्यासाठी नेहाने ही मालिका सोडली आहे. राजीनामा स्वीकारल्यानंतर निर्माते नवीन अंजलीचा शोध सुरू करतील.

  • दिशा वकानीच्या कमबॅकवर अद्याप प्रश्नचिन्ह

या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिशा वकानी उर्फ ​​दया भाभीने नेहा मेहताच्या आधी शो सोडली आहे. प्रेग्नेंसीमुळे दिशाने दोन वर्षांपूर्वी मॅटर्निटी रजा घेतली होती, परंतु अद्याप ती मालिकेत परतली नाही. निर्मात्यांशी तिची चर्चा सुरूच आहे, परंतु अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. काही महिन्यांपूर्वी निर्माते दया भाभीचा कमबॅक दाखवणारा प्रोमो शेअर करणार होते, पण दिशाने त्यासाठी नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...