आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • After #JusticeForChutki Trend Makers Gave Good News To The Fans Of Chutki, Chhota Bheem Will Not Marry Rani Indumati

स्पष्टीकरण:#JusticeForChutki ट्रेंड झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली चुटकीच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, छोटा भीम राजकुमारी इंदुमतीशी लग्न करणार नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या कंपनीला स्पष्टीकरण देत ही अफवा असल्याचे सांगावे लागले आहे.

पोगो टीव्हीचा लोकप्रिय कार्टून शो 'छोटा भीम'ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे छोटा भीम लग्न करतोय, अशी अफवा सध्या ट्विटरवर पसरली आहे. छोटा भीम त्याची बालपणीची  मैत्रीण असलेल्या चुटकीऐवजी राजकुमारी इंदुमतीसोबत लग्न थाटणार असल्याची ही चर्चा आहे. या बातमीने नेटकरी मात्र चांगलेच संतापले असून त्यांनी चुटकीसाठी न्यायाची मागणी करत #JusticeForChutki हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. ही चर्चा एवढ्या गांभीर्याने झाली की, या कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या कंपनीला स्पष्टीकरण देत ही अफवा असल्याचे सांगावे लागले आहे. 

छोटा भीम या कार्टून शोची निर्मिती करणा-या ग्रीन गोल्ड अॅनिमेशन प्रायव्हेट लिमिटेडने एक पत्रक जारी केले आहे. “या मालिकेतील सर्व पात्र म्हणजेच छोटा भीम, इंदुमती आणि चुटकी ही लहान मुलेच आहेत. छोटा भीमच्या लग्नाची इंटरनेटवर होणार चर्चा खोटी आणि अर्थहीन आहे. आपल्या या लहान बच्चे मंडळींना लहानच राहू द्या आणि त्यांच्या निरागस जीवनाला आणि कथेला प्रेम आणि लग्नासारख्या गोष्टींपासून लांब ठेवूयात,” असे कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.   

10 हजारांहून अधिक लोकांनी चुटकीला दिला पाठिंबा 

छोटा भीमच्या लग्नाची बातमी समोर येताच  #JusticeForChutki ने ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात केली. चुटकीच्या समर्थनार्थ दहा हजारांहून अधिक लोक पुढे आले. छोटा भीमला उद्देशून तू असं का वागलास?, त्यांनी एकत्रच असायला हवं, ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत, सगळे पुरुष सारखेच अशा प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या. काही लोक जगभरातील मोठ्या बातम्यांमध्ये कार्टून कॅरेक्टर ट्रेंड होताना बघून आश्चर्यचकित झाले, तर काहींनी मीम्स देखील शेअर केले. 

'छोटा भीम'चे पुनःप्रसारण 

लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारण यासारखे अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जात आहेत. दरम्यान, पोगो वाहिनीचा कार्टून शो 'छोटा भीम'चेही पुनःप्रसारण सुरु झाले आहे. ढोलकपूर गावाची कहाणी दाखविणार्‍या लहान मुलांच्या या कार्टून शोमध्ये छोटा भीम, चुटकी, इंदुमती, राजू, जग्गु, कालिया, ढोलू, भोलू हे पात्र महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.

0