आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • After Khesari Lal Yadav And Nirhua, Bhojpuri Star Amrapali Dubey Get Offered Of Bigg Boss 14, Wanted To Marry Salman Khan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 अपडेट:खेसारी लाल यादव आणि निरहुआ नंतर आता भोजपुरी स्टार आम्रपाली दुबेला मिळाली शोची ऑफर, सलमान खानसोबत करायचे होते हिला लग्न

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्रपाली सलमानची मोठी चाहती असल्याने ती या कार्यक्रमाला नकार देणार नसल्याचे सांगितले जात आहे.

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक भोजपुरी कलाकारांनी आपल्या माइंड गेमने या शोला रंजक बनवले आहे. रवि किशन, निरहुआ (दिनेश लाल यादव), मनोज तिवारी, संभावना सेठ, मोनालिसा, दीपक ठाकूर आणि गेल्या पर्वातील खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक भोजपुरी स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव सामील होत आहे. हे नाव आहे स्वतःला सलमानची सर्वात मोठी चाहती म्हणणारी आणि त्याच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त करणारी अभिनेत्री आम्रपाली दुबे.

भोजपुरी एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील या लोकप्रिय अभिनेत्रीला बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोची ऑफर दिली आहे. आम्रपाली सलमानची मोठी चाहती असल्याने ती या कार्यक्रमाला नकार देणार नसल्याचे सांगितले जात आहे.

स्पॉटबॉयच्या नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस 14 च्या निर्मात्यांनी आम्रपाली दुबेसोबत संपर्क साधला आहे. यूपी बिहारमध्ये आम्रपालीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, ज्याचा चॅनेल आणि या शोला फायदा होऊ शकतो. तथापि, या शोमध्ये येण्यासाठी तिने होकार दिला की नाही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आम्रपालीने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ती सलमानची इतकी मोठी फॅन आहे की तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे.

  • आम्रपालीने करिअरची सुरूवात हिंदी टीव्ही कार्यक्रमातून केली

आम्रपालीने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात हिंदी डेली सोपद्वारे केली. 'रहना हैं तेरी पलकों के छांव में' ही तिची पहिली मालिका होती. याशिवाय 'मायका' आणि 'सात फेरे' या मालिकांमध्येही ती झळकली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असताना तिला भोजपुरी इंडस्ट्रीतून ऑफर आली आणि त्यानंतर तिने आपला मोर्चा तिकडे वळवला. तिने भोजपुरी चित्रपट आणि म्युझिक अल्बममधून 2014 मध्ये करिअरची नवी सुरुवात केली होती.

View this post on Instagram

Want that body back 🥴😭

A post shared by Dubey Aamrapali 🎀 (@aamrapali1101) on Aug 26, 2020 at 10:44pm PDT

यंदाच्या पर्वात 13 सेलिब्रिटी आणि 3 कॉमनर्स बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. कॉमनर्सची डिजिटल ऑडिशनद्वारे निवड केली जाईल. तर घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणा-या बर्‍याच टीव्ही सेलेब्सची नावे यापूर्वी समोर आली आहेत. नैना सिंह, निया शर्मा, पवित्र पुनिया, आकांक्षा पुरी, आमिर अली आणि शिविन नारंग यांची नावे कन्फर्म समजली जात आहेत. या व्यतिरिक्त सध्या मेकर्स अनु मलिक, राधे मां, साक्षी चोप्रा सारख्या बर्‍याच लोकांशी चर्चा करत आहेत. सध्या शोच्या सेटची दुरुस्ती सुरू आहे, ती पूर्ण झाल्यावर 4 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser