आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री पिया बाजपेयी आणि टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्या भावांचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त मंगळवारी आले होते. आता त्यानंतर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता झैन इमामच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. झैनला 'नामकरण' या मालिकेसाठी ओळखले जाते. झैनने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सोबतच त्याने आपल्या भावासोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
'भाईजान तू आम्हाला एवढ्या लवकर सोडून गेलास'
झैन इमामने पोस्ट शेअर करत लिहिले, ‘आम्ही आमचा सर्वांचा लाडका आणि मोठा चुलत भाऊ कुकू म्हणजेच सईद ताकी इमामला अलविदा करत आहोत. त्याने सर्वांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली होती. माझा अजूनही विश्वास बसत नाही की भाईजान तू आम्हाला एवढ्या लवकर सोडून गेलास. आम्हा सर्वांचा विश्वास होता की तू लवकर बरा होऊन घरी परत येणार. पण अल्लाहचा काही वेगळाच प्लॅन होता. तुझी खूप आठवण येईल,’ या आशयाची पोस्ट झैनने लिहिली आहे.
10 दिवसांपूर्वीच कुकूच्या आईचे झाले होते निधन
झैनने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, ‘इंडस्ट्रीने एक लेखक, कवी आणि चांगला व्यक्ती गमावला आहे. दहा दिवसांपूर्वीच तू तुझ्या अम्मी आणि आम्ही आमच्या बडी अम्मीला गमावले होते. तू बरा होऊन घरी परतशील असे वाटले होते. जवळजवळ 300 लोक तुझ्यासाठी प्रार्थना करत होते. तुझी रायटर टीम देखील तू लवकर बरा व्हावा यासाठी औषधे आणि इतर गोष्टींसाठी प्रयत्न करत होती. तुझ्या रायटर टीमचे आभार, ज्यांनी या कठीण काळात आमची साथ दिली.’ या पोस्टमध्ये झैनने त्याला मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
झैनच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि जॅस्मिन भसीन, अली गोनी, अविका गौरसह अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.