आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • After Nisha Rawal's Allegation Himanshi Parashar's Name Surfaced In Affair With Karan Mehra Comments On Post Went Viral

निशा-करण आणि 'वो':निशा रावलच्या आरोपानंतर करण मेहरासोबत जोडलं जातंय हिमांशी पराशरचे नाव, व्हायरल झालेल्या पोस्टवर दिल्या होत्या कमेंट्स

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक हिमांशीला निशा आणि करण यांच्यातील 'वो' असल्याचे म्हणत आहेत.

अभिनेता करण मेहरावर त्याची पत्नी निशा रावल हिने अनेक गंभीर आरोप केले आहेत. करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचे निशाने म्हटले आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री हिमांशी पराशरचे नाव समोर आले आहे. हिमांशी आणि करणचे अफेअर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. हिमांशीने मावां ठंडिया छावां या पंजाबी शोच्या सेटवरील करणसोबतचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. या व्हिडिओच्या करणच्या कमेंटवर हिमांशीने लिहिले होते, 'आपके लिए हम कहीं भी गिर जाएंगे करन जी' आता सोशल मीडियावर हिमांशीची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यावरुन लोक हिमांशीला निशा आणि करण यांच्यातील 'वो' असल्याचे म्हणत आहेत.

करणला मुलगा कविशची चिंता
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर करणने एका मुलाखतीत आपला 4 वर्षांचा मुलगा कविशबद्दल चिंता व्यक्त केली आहे. करण म्हणाला, 'मला सुरुवातीला कविश निशा सोबत राहावा असे वाटले होते. परंतु आता या सर्व गोष्टींचा माझ्या मुलावर परिणाम होतोय. पण त्याच्यावर याचा परिणाम व्हावा, अशी माझी इच्छा नाही. मला त्याची चिंता लागली आहे.'

हिमांशीच्या पोस्टवरील या कमेंट्सवरुन तिचे नाव करणसोबत जोडले जात आहे.
हिमांशीच्या पोस्टवरील या कमेंट्सवरुन तिचे नाव करणसोबत जोडले जात आहे.

करणचा दावा - निशाने स्वत:च भींतीवर डोके आपटले होते
दरम्यान त्याआधी करणने त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिने मला दिली होती. त्यानंतर तिने स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचे सर्वांना सांगितले.'

बातम्या आणखी आहेत...