आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमधील मनोरंजन:19 एप्रिलपासून 'रामायण'च्या जागी प्रसारित होणार 'उत्तर रामायण', 'श्रीकृष्णा'ची परतण्याची तयारी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रामायण' हा कार्यक्रम मागील पाच वर्षांचा विक्रम मोडत टीव्हीवरील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम ठरला.

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मागणीवरुन सुरू झालेल्या 'रामायण'च्या यशानंतर दूरदर्शन आता 'लव कुश' या मालिकेचे पुन्हा प्रसारण करणार आहे. या मालिकेला 'उत्तर रामायण' या नावाने ओळखले जाते. 19 एप्रिलपासून ही मालिका रात्री 9 वाजताच्या स्लॉटमध्येच प्रसारित केली जाणार आहे, तर सकाळी 9 वाजताच्या स्लॉटमध्ये त्याचे पुनर्प्रक्षेपण केले जाईल. ही माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी ट्विटरवरुन दिली. आगामी काळात 90च्या दशकातील लोकप्रिय मालिका श्रीकृष्णाही पुन्हा प्रसारित केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

शशी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "दूरदर्शन व अखिल भारतीय रेडिओच्या माध्यमातून सकाळी अनेक राज्यांत शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे लक्षात घेता 'उत्तर रामायण'चे फ्रेश एपिसोड फक्त रात्री 9 वाजता दाखविण्यात येतील, रिपीट टेलिकास्ट सकाळी 9 वाजताच्या स्लॉटमध्ये केले जाईल."

  • रविवारपासून सुरु होणार नवीन फॉर्मेट

शशी यांनी त्यांच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, “युद्धाच्या भागातील मुख्य कथेचा शेवट रविवारी सकाळी 9 वाजता प्रसारित केला जाईल. रविवारी रात्री 9 वाजेपासून उत्तर रामायणचे नवीन एपिसोड दाखवले जातील."

  • मूळ 'रामायण' शनिवारी संपत आहे

दुसर्‍या ट्विटमध्ये शशी यांनी लिहिले की, "उद्या म्हणजे शनिवारी साकळी आणि रात्री 9 वाजता रामायणाचे युद्धांचे उर्वरित एपिसोड टेलिकास्ट केले जातील. जेणेकरुन उत्तर रामायणाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य कथानकाची सांगता होईल." विशेष म्हणजे रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका 1987 मध्ये पहिल्यांदा सुरू झाली होती. 28 मार्च 2020 पासून लोकांच्या आग्रहास्तव ही मालिका पुन्हा सुरु केली गेली. हा कार्यक्रम मागील पाच वर्षांचा विक्रम मोडत टीव्हीवरील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम ठरला.

  • श्रीकृष्णावरही काम चालू आहे

शशी शेखर यांना टॅग करीत जेव्हा एका ट्विटर यूजरने श्रीकृष्णा ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचे आवाहन केले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, "आम्ही यावर काम करत आहोत. आम्ही लवकरच तुम्हाला एक अपडेट देऊ. बघत रहा." 221 भाग असलेली 'श्रीकृष्णा' ही मालिका 1993 ते 1996 दरम्यान प्रथम प्रसारित झाली होती. या मालिकेचेही लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता रामानंद सागर होते.

बातम्या आणखी आहेत...